|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा संजीवनीला फटका!

पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा संजीवनीला फटका! 

वार्ताहर/ औंध

राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत आखाडय़ात विजेती ठरलेली महाराष्ट्राची संजीवनी ढाणेला पंचांच्या पक्षपाती भूमिकेचा चांगलाच फटका बसला. रौप्यपदकावर समाधान मानावे लागल्यामुळे हताश झालेल्या संजीवनीला हातातोंडाशी आलेल्या सुवर्णपदकापासून तिला वंचित रहावे लागले. पंचांच्या भूमिकेबद्दल तीचे पालक आण्णासाहेब ढाणे यांनी आक्षेप घेतला असून क्रीडा विभागाने तीला न्याय द्यावा, अशी मागणी ढाणे यांनी केली आहे.

    त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संजीवनी ढाणे हिची शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी 14 वर्षाखालील गटातून महाराष्ट्राच्या संघातून निवड झाली होती. नुकतीच दिल्ली येथील छत्रसाल आखाडय़ात या राष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. सुरवातीपासून नेत्रदीपक कुस्त्या करून तीने अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत दिल्लीच्या आदिती कुमारी बरोबर लढत झाली. अटीतटीच्या लढतीत संजीवनीने आदितीला चितपट केले. आखाडय़ातील पंचांनी शिट्टी वाजवली. मात्र, साईडपंच यांनी वेळ संपल्याचे कारण पुढे करून कुस्ती गुणावर घेतली. यामध्ये देखील दिल्लीच्या पैलवानांना चुकीचे गुण बहाल करून पंचांनी विजयी करण्यासाठी हातभार लावला आणि संजीवनीला सुवर्णपदकापासून वंचित ठेवले. याबाबत आम्ही आक्षेप घेतला. भारतीय कुस्ती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांना भेटून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. मात्र, पंचांच्या पक्षपाती वागणुकीबद्दल कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. 

Related posts: