|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » खटाव-माण ऍग्रो साखर कारखाना पूर्ण क्षमतेने चालविणार

खटाव-माण ऍग्रो साखर कारखाना पूर्ण क्षमतेने चालविणार 

प्रतिनिधी/ वडूज

चालू वर्षीच्या गळीत हंगामात खटाव-माण ऍग्रो साखर कारखाना पूर्ण क्षमतेने चालविला जाणार असल्याची माहिती संस्थापक माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी दिली.

   पडळ (ता. खटाव) येथे कारखाना स्थळावर आयोजित केलेल्या प्रथम वर्ष बॉयलर प्रदीपन समारंभात ते बोलत होते. यावेळी चेअरमन मनोजदादा घोरपडे, संचालक नंदकुमार मोरे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीपआण्णा विधाते, कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे, संचालक कृष्णाजी शेळके, विक्रम घोरपडे, महेश घार्गे, आण्णासाहेब निकम, जयवंतराव जाधव, हणमंतराव घोरपडे, अनिल माने, प्रशांत कणसे, युवराज साळुंखे, अमोल पवार, महेश चव्हाण, ऍड. धनाजीराव जाधव, पोपटराव शिंदे, दत्तात्रय शिंदे यांची उपस्थिती होती.

   घार्गे पुढे म्हणाले, अत्यंत प्रतिकुल परिस्थिती असताना विशिष्ट ध्येयवादाने आम्ही कारखान्याची उभारणी केली आहे. या कारखान्याच्या निर्मितीमध्ये खटाव-माणसह कोरेगांव, कराड, सातारा भागातील उपेक्षित शेतकऱयांना न्याय देणे ही भूमिका आहे. इंडस्ट्री उभारणीमध्ये घोरपडे बंधूंना चांगला अनुभव आहे. त्यांचा अनुभव व आपले व्यवसायिक कौशल्य याची योग्य सांगड घालून कारखाना पूर्ण क्षमतेने चालविला जाणार आहे.

    मनोजदादा घोरपडे म्हणाले, गेल्यावर्षी कारखान्याचा चाचणी गळीत हंगाम झाला. त्यावेळी कमी अवधी असूनसुध्दा आम्ही योग्य प्रकारे यंत्रसामुग्रीची जुळणी केली होती. चालू वर्षी आमच्याकडे भरपूर वेळ मिळाला. हंगाम चालविण्यासाठी सर्वतोपरी तयारी झाली आहे. ऊस दराच्या बाबतीतही आम्ही इतर कारखान्यांच्या तुलनेत कोठेही मागे राहणार नाही. शेतकरी, कामगार व वाहतुकदारांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवून चांगल्या प्रकारे सहकार्य करावे. यावेळी नंदकुमार मोरे यांचेही मनोगत झाले. संग्राम घोरपडे यांनी आभार मानले.

     कार्यक्रमास टेक्नीकल डायरेक्टर बालाजी जाधव, चिप केमिस्ट जे. डी. थोरात, शेती अधिकारी पवार, श्री. महाडिक, श्री. मोरे, श्री. घोरपडे, नारायण चव्हाण, प्रताप बिडकर आदींसह कामगार, शेतकरी उपस्थित होते.।़

Related posts: