|Sunday, January 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » माणदेशी महोत्सव महिलांच्या स्वप्नांना बळ देणारा

माणदेशी महोत्सव महिलांच्या स्वप्नांना बळ देणारा 

प्रतिनिधी / सातारा

व्यंकटेश माडगुळकरांच्या पुस्तकांमध्ये माणदेशी माणसांचे जे चित्र रंगवण्यात आले आहे. त्याच चित्राप्रमाणे माणदेशी माणूस खरोखरच कष्टाळू आहे. दुष्काळी परिस्थिती असूनही मातीतून उगवून सुद्धा नभाला भिडणाऱया वेलीप्रमाणे येथील महिलांचे कार्य आहे. माणदेशी फौंडेशनचा माणदेशी महोत्सव हा समाजाला एक नवी दिशा देताना दिसत आहे. माणसारख्या दुष्काळी भागाला जगण्याचा आधार या फौंडेशनमुळे मिळत आहे. महिलांच्या स्वप्नांना बळ दिल्याने महिला या फौंडेशनच्या माध्यमातून स्वतःचे विश्व् निर्माण करताना दिसत असल्याचे मत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी व्यक्त केले.

जिल्हा परिषद मैदानावर आयोजित माणदेश महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी माणदेशी फौंडेशनच्या संस्थापिका श्रीमती चेतना सिन्हा, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप रोकडे, इंड्स्ट इंडियाचे प्रकर्ष मिश्रा, युवराज पाटील, रेखा कुलकर्णी, वंदना शिंदे आदी उपस्थित होते.
श्वेता सिंघल म्हणाल्या, आज आपण पहातो. सातारा जिल्हा हा भौगोलिक दृष्टय़ा विषम आहे.

माण तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. तरीहीसुद्धा तेथील लोक खचून न जाता तेवढय़ाच उमेदीने आपली ओळख निर्माण करताना मी पाहिले आहे. मग पाणी फौंडेशनच्या चळवळीत झोकून देवून काम करणारे गावेच्या गावे असतील किंवा माणदेशी फौंडेशनच्या माध्यमातून महिलांची ताकद उभी राहलेली पाहत आहे. माणदेशी महोत्सवातून महिला बचत गटाच्या महिलांना रोजगाराची संधी दिली आहे. यातून महिलांना त्यांचे विश्व तयार करण्यासाठी फौंडेशन पावले उचलत आहे. माणदेशी महोत्सवातून समाजाला एकवेगळी दिशा मिळत आहे. महोत्सवातून महिला सबलीकरणाला योगदान मिळत असून चेतना सिन्हा या यासाठी अग्रणी आहेत. या महोत्सवात महिलांचेही योगदान मोठय़ा प्रमाणात आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन महिला काम करतात हे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

चेतना सिन्हा म्हणाल्या, माण देशात सगळे काही मिळते. तेथील महिला कष्टाळू आहेत. गावाकडच्या आहेत. परंतु त्यांनी तयार केलेल्या गोधडय़ा, वस्तू या दर्जेदार आहेत. त्यांच्या मालाला हक्काची बाजारपेठ म्हणून हा महोत्सव असतो. महिलांना उद्योगी बनवण्यासाठीही मार्गदर्शन केले जाते. आमच्या माणदेशातल्या महिला आज कुठेही मागे राहिलेल्या दिसत नाहीत, असे त्यांनी सांगितले.

महोत्सव पाहून जिल्हाधिकाऱयांनी केले कौतुक

जिल्हा परिषदेच्या मैदानावर अलिकडे आयोजित करण्यात येत असलेला माणदेश महोत्सव खरोखर पाहण्यासारखा आहे. त्यांनी हा महोत्सव पाहून महिलांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू पाहून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल याही अंचबीत झाल्या. त्यांनी त्या महिलांचे कौतुक केले.

चंदाताई तिवारी यांचे भारुड

माणदेश महोत्सव म्हणजे सातारकरांसाठी हक्काची पर्वणीच ठरते. शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 4 या दरम्यान विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या सहकार्याने जिल्हा उद्योग केंद्र यांच्या सहकार्याने मार्केटीगं व व्यवसाय मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलो आहे. तसेच सायंकाळी पाच वाजता सौ. चंदाताई तिवारी यांचा भारुडाचा कार्यक्रम होणार आहे.

Related posts: