|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » संविधान हाच 130 कोटी जनतेचा धर्म : डॉ. श्रीपाल सबनीस

संविधान हाच 130 कोटी जनतेचा धर्म : डॉ. श्रीपाल सबनीस 

 ऑनलाईन टीम / पुणे :

आज देशामध्ये कोणाला हिंदू राष्ट्र तर कोणाला मुस्लिम राष्ट्र हवे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सर्व धर्मांना स्वातंत्र्य दिले. सर्व धर्मातील उत्तम विचारांचे संचित संविधानामध्ये आहे, म्हणूनच संविधान हाच 130 कोटी जनतेचा धर्म आहे, असे मत अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समितीतर्फे 70 व्या भारतीय संविधान दिनानिमित्त 70 संविधानवादी पक्ष, संघटना आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानार्थ संविधान रत्न पुरस्कार प्रदान सोहळय़ाचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये करण्यात आले होते. यावेळी डॉ. सबनीस बोलत होते.

याप्रसंगी आमदार प्रणिती सुशिलकुमार शिंदे आणि महाराष्ट्र साहित्यकला प्रासरणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर यांना डॉ. श्रीपाल सबनीस आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते संविधान रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, सन्मानपत्र आणि संविधानाची प्रत असे पुरस्काराचे स्वरुप होते. सुवर्णा डंबाळे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. यावेळी संविधानवादी पक्ष आणि कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. युक्रांदचे संदीप बर्वे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामुहिक वाचन केले.

यावेळी बोलताना डॉ. सबनीस म्हणाले, प्रणीती शिंदे सोज्वळ असून वडिलांचा वारसा पुढे चालवत आहेत. त्यांच्या सारख्या सेक्मयुलर नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे. सचिन ईटकर म्हणजे संवेदनशील माणूस आहे. धर्मनिरपेक्ष समाज निर्माण होण्यासाठी धर्मनिरपेक्ष नेते व कार्यकर्ते निर्माण होणे गरजेच आहे. परंतु, आज कधीही नव्हे एवढी संविधान विषयक जागरुकतेची गरज निर्माण झाली आहे.

भारतातील कोणत्याही व्यवस्था संविधान जागरुकतेबाबत ईमानदारी बाळगत नाहीत. त्यामुळेच राजकीय, आर्थिक, सामाजिक क्षेत्रामध्ये बेईमानी वाढत चालली आहे. धर्मिक दंगली, राजकारणातील गळेकापू स्पर्धा, मॉबलिचिंग वाढले. कारण सरकार संविधानाविषयी ईमानदार नाही. याला केवळ नेतेच नव्हे तर जनताही जबाबदार आहे. आज आदिवासी, शेतकरी, कामगार कोणीही सुखी नाही. केवळ राजकारणी नेते सुखी आहेत. राजकारणावर वचक हवा म्हणून संविधान हाच सर्वांचा एकच धर्म असला पाहिजे. महात्मा गांधीनी नेहरू पटेलांना दूर सारून संविधान समितीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निवड केली. त्यांनी तीन वर्षे मेहनत घेऊन आजारी असतानाही संविधान तयार केले. संविधान हेच सर्व धर्मांचे संचित आहे, असेही सबनीस म्हणाले.

Related posts: