|Sunday, January 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » धुंदमधुमती – ‘हेलन’ सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन

धुंदमधुमती – ‘हेलन’ सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन 

पुणे / प्रतिनिधी :   

पूना गेस्ट हाऊस स्नेहमंचातर्फे सुप्रसिद्ध अभिनेत्री हेलन यांच्या वाढदिवसानिमित्त धुंदमधुमती हेलन या दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हेलनचे नृत्य आणि सांगितिक प्रवास यावेळी रसिकांसमोर सादर होणार आहे. सोमवार दि. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता लक्ष्मी रस्त्यावरील पूना गेस्ट हाऊस येथे हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.
हेलन यांच्यावर चित्रीत झालेली हिंदी चित्रपटातील अविस्मरणीय गीते यावेळी रसिकांसमोर सादर होणार आहेत. तेजस्विनी पाहुजा, स्रेहल आपटे, रविंद्र शाळू  हे कलाकार गायन सादर करणार आहेत़ तसेच सुलभाताई तेरणीकर यांच विशेष सहभाग असणार आहे़ अजित कुमठेकर हे या कार्यक्रमाचे समन्वयक आहेत़ तरी पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार व अभय सरपोतदार यांनी केले आहे. प्राजक्ता मांडके या निवेदन करणार आहेत. पिया तू अब तो आजा…ओ हसिना झुल्फोवाली…आज की रात..यांसारखी गाजलेली गीते यावेळी सादर होणार आहेत. 

Related posts: