|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » आधुनिक जीवनशैली आणि गायत्री स्तोत्र कार्यशाळा रविवारी

आधुनिक जीवनशैली आणि गायत्री स्तोत्र कार्यशाळा रविवारी 

पुणे / प्रतिनिधी : 

आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये सर्वांनाच ताणतणावांना सामोरे जावे लागते़ यातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकजण काहीतरी सकारात्मक मार्ग शोधत असतो़ आपल्या अडचणी आणि प्रश्न शेवटी आपल्यालाच सोडवावे लागतात़ ताणतणावावर मात करून जीवन आनंदी बनविण्यासाठी परमहंस स्वच्छंदानंद सेवा प्रतिष्ठानतर्फे आधुनिक जीवनशैली आणि गायत्री स्तोत्र या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे़. ही कार्यशाळा डहाणूकर कॉलनीमधील श्री राम मंदिर येथे रविवार, दिनांक २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत होणार आहे़ प्रसाद बोडस हे यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत़.
श्री स्वच्छंदानंद स्वामी यांनी मनुष्य जीवनातील नकारात्मकता कमी करून सकारात्मकता वाढविण्यासाठी समाजाला मार्ग दाखविला़. कै़ राजस साठे हे त्या मार्गाचा परिचय करून देत असत़. त्यांच्यानंतर त्यांचे जीवनविषयक मार्गदर्शन सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी देवी भागवत या ग्रंथावर आधारित स्वामी स्वच्छदानंद लिखित श्री देवी विजय या ग्रंथातील गायत्री स्तोत्र हे आधुनिक जीवनातील दुष्परिणाम दूर करण्यासाठी कसे उपयोगी पडते, हे माहिती करून देण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे़. अधिक माहितीसाठी मो. ९८२२२५११०९ / ७०३०७५९९५५ या क्रमांकावर संपर्क करावा़, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
  

Related posts: