|Sunday, January 19, 2020
You are here: Home » Top News » पुणे : महापौरपदी भाजपचे मुरलीधर मोहोळ, उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे यांची वर्णी 

पुणे : महापौरपदी भाजपचे मुरलीधर मोहोळ, उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे यांची वर्णी  

पुणे / प्रतिनिधी : 

पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांची, तर  उपमहापौर पदासाठी भाजपच्याच सरस्वती शेंडगे यांची शुक्रवारी वर्णी लागली आहे. महापौरपदासाठी मोहोळ यांच्या विरोधात आघाडीच्या प्रकाश कदम यांना पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी शिवसेना व काँग्रेसने पाठिंबा दिला. मात्र, यात या महाविकास आघाडीला अपयश आले. भाजप नगरसेवकांचे पालिकेत वर्चस्व असल्याने भाजपने दोन्ही जागांवर आपले नाव कोरले.

2017 साली झालेल्या निवडणुकीनुसार भाजपला निर्विवाद बहुमतानुसार 97, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 39 नगरसेवक आहेत. शिवसेनेचे 10, काँग्रेसचे 9, मनसे 2 आणि इतर 5 अशी नगरसेवक संख्या महापालिकेत आहेत. त्यामुळे मोहोळ यांची निवड निश्चित मानली जात होती. आजच्या निवडणुकीत त्यांना 97, तर कदम यांना 59 मते मिळाली. उपमहापौरपदासाठी भाजपच्या सरस्वती शेंडगे यांना 97, तर महाविकास आघाडीच्या चांदबी हाजी नदाफ यांना 59 मते मिळाली. यावेळी मनसेचे 2 नगरसेवक तटस्थ, तर पाच नगरसेवक मतदानाच्यावेळी गैरहजर होते. कौस्तुभ दिवेगावकर यांनी पीठासन अधिकारी म्हणून काम बघितले. राज्यात आणि केंद्रात भाजप-शिवसेना युती तुटल्याचे पडसाद या निवडणुकीत बघायला मिळाले.

महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत ‘महाविकास’ आघाडी करण्यात आली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला शिवसेनेच्या नगरसेवकांनी मतदान केले आहे.

 

 

 

Related posts: