|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » Top News » पुण्यात अमेरिकन डॉलर हिसकावले

पुण्यात अमेरिकन डॉलर हिसकावले 

पुणे  / प्रतिनिधी : 

परकीय चलन विनिमयाचे व्यवहार करणाऱया कंपनीच्या कर्मचाऱयाकडून सात हजार अमेकिरन डॉलर हिसकावून एकाने पळ काढला. ही घटना कल्याणीनगर येथील वेस्ट व्हयू अपार्टमेंन्टमधील तिसऱया मजल्यावर घडली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संकेत गावडे (31,रा.कासारवाडी,पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. ते एका प्रा.लि.कंपनीत आठ वर्षापासून कामाला आहेत. ते काम करीत असलेल्या कंपनीतील शाखेत परकीय चलन विनिमयाचे व्यवहार होतात. कोणा व्यक्तीस परकीय चलन पाहिजे असल्यास त्याचा फोन आल्यावर, त्यांना कंपनी घरपोच परकीय चलन नेऊन देते. त्या बदल्यात भारतीय चलन रोख स्वरुपात किंवा ऑन लाईन पध्दतीने स्विकारले जाते. घटनेच्या दिवशी आरोपीने फिर्यादीला सात हजार अमेरिकन डॉलर (5 लाख 8 हजार 200 रुपये) घेऊन नमूद ठिकाणी बोलवले होते.

फिर्यादीने अमेरिकन डॉलर देण्यासाठी बॅगेतून बाहेर काढल्यावर आरोपीने ते जबरदस्तीने हिसकावून, फिर्यादीला धक्का मारुन सदनिकेच्या दरवाजाला बाहेरुन कडी लावून पळ काढला.

 

Related posts: