|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » leadingnews » ‘मोदीजी है तो मुमकीन है…’ : देवेंद्र फडणवीस

‘मोदीजी है तो मुमकीन है…’ : देवेंद्र फडणवीस 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होणार, हे जवळपास निश्चित झालेलं असतानाच महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. सकाळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीच, पण त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन राज्यालाच नव्हे तर सर्व देशाला धक्का दिला आहे.

यानंतर दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना ‘मोदीजी है तो मुमकीन है… असे म्हणत केंद्र सरकारच्या पुढाकारानेच हे यश मिळाले आहे. असे म्हणत फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

एक मित्र आपल्याला सोडून गेला. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या समर्थनातून मजबूत सरकार देणार, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

 

Related posts: