|Monday, February 24, 2020
You are here: Home » leadingnews » अजित पवारांची मनधरणी करण्यास राष्ट्रवादीच्या नेत्यांना पुन्हा अपयश

अजित पवारांची मनधरणी करण्यास राष्ट्रवादीच्या नेत्यांना पुन्हा अपयश 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांची मनधरणी करण्यास राष्ट्रवादीच्या नेत्यांना पुन्हा एकदा अपयश आले आहे. अजित पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि दिलीप वळसे-पाटील यांनी आज अजित पवारांची भेट घेतली. दीड तास चाललेल्या या चर्चेतून कोणताही मार्ग निघाला नाही. अजित पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने जयंत पाटील आणि वळसे-पाटील तेथून बाहेर पडले.

अजित पवारांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्याच काही आमदारांच्या उपस्थितीत त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, ज्या आमदारांची शपथविधीला उपस्थिती होती त्यामधील आमदार पुन्हा शरद पवारांकडे वळले आहेत. त्यामुळे अजित पवार एकटे पडण्याची शक्यता आहे, असे होऊ नये म्हणून राष्ट्रवादीकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत.

Related posts: