|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ‘180 पेक्षा जास्त संख्याबळ असतानाही शिवसेनेने जनादेशाचा अनादर केला’

‘180 पेक्षा जास्त संख्याबळ असतानाही शिवसेनेने जनादेशाचा अनादर केला’ 

ऑनलाईन टीम/ मुंबई

भाजपाच्या विधीमंडळ गटाची बैठक पार पडली. या बैठकीत नेमके काय निर्णय घेण्यात आले? कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली याबाबत भाजपा नेते आशिष शेलार यांनी पत्रकारपरिषदेद्वारे माध्यमांना माहिती दिली.

180 पेक्षा जास्त संख्याबळ असतानाही शिवसेनेने जनादेशाचा अनादर, किंबहुना हेटाळणी केली असल्याचे भाजपकडून यावेळी सांगण्यात आलेदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार विश्वासदर्शक ठरावाला बहुमताना सामोरं जाईल, त्याच्या रणनीतीवर चर्चा केली जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. तर बहुमताचा आकडा वाढवण्यासाठी नारायण राणे, विखेपाटील, पाचपुते आणि नाईक यांच्यावर विशेष जबाबदारी असणार आहे

आमचा आमच्या आमदारांवर आणि आमच्या आमदारांचा नेतृत्वावर विश्वास, त्यामुळे त्यांना कोणत्याही हॉटेलमध्ये ठेवलेलं नाही, आमदारांवर विश्वास नसलेल्या शिवसेनाकाँग्रेसराष्ट्रवादीवर आमदारांना डांबून ठेवण्याची वेळ आल्याची खरमरीत टीका देखील यावेळी करण्यात आली.

Related posts: