|Friday, December 6, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » अवयवदानात दिल्लीत अग्रस्थानी

अवयवदानात दिल्लीत अग्रस्थानी 

नवी दिल्ली

 सरकारकडून चालविल्या जाणाऱया जागरुकता मोहिमेमुळे मागील 3 वर्षांमध्ये अवयवदानाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पण 28 राज्ये आणि 9 पेंद्रशासित प्रदेशांपैकी 22 ठिकाणीच अवयवदानास प्रारंभ झाला आहे. अवयवदानाच्या प्रकरणी दिल्ली अग्रस्थानी आहे. तर उत्तरप्रदेश आणि बिहार ही मोठी राज्ये पिछाडीवर आहेत.

आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात अवयवदानाची प्रकरणे 2016 या वर्षातील 9046 संख्येवरून वाढत 2018 या साली 10387 संख्येवर पोहोचली आहेत. दिल्ली या प्रकरणी सर्व राज्यांपेक्षा आघाडीवर आहे. दिल्लीत 2018 मध्ये सर्वाधिक 2066 अवयवांचे दान करण्यात आले. हा आकडा 2016 मध्ये 1947 तर 2017 मध्ये 1989 इतका होता. देशात मूत्रपिंड, फफ्फुसासह स्टेम सेल प्रत्यारोपणाची मागणी सर्वाधिक आहे.

Related posts: