|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सुनेत्रा जोशी यांना मानाचा हिरकणी पुरस्कार प्रदान

सुनेत्रा जोशी यांना मानाचा हिरकणी पुरस्कार प्रदान 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरी येथील नामवंत साहित्यिका आणि ‘तरुण भारत संवाद’च्या लेखिका सुनेत्रा जोशी यांना जालना येथील हिरकणी बहुउद्देशीय संस्थेने मानाचा राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार प्रदान केला आहे.

गेल्या तीन वर्षापासून हिरकणी संस्थेच्यावतीने उत्तम कामगिरी पार पाडलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जात आहे. अलिकडेच धुळे येथील एका शानदार कार्यक्रमात सुनेत्रा विजय जोशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी प्रमुख अतिथी विजया मानमोडे, माधुरी चौधरी आणि गझलकार अजय बिरारी, सुर्यवंशी उपस्थित होते. सुनेत्रा जोशी या नामवंत साहित्यिका असून अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो.

Related posts: