|Friday, December 13, 2019
You are here: Home » Automobiles » ‘TRIUMPH’ ची 2500 सीसी ‘रॉकेट 3’ बाईक लवकरच भारतात

‘TRIUMPH’ ची 2500 सीसी ‘रॉकेट 3’ बाईक लवकरच भारतात 

 ऑनलाईन टीम / मुंबई :

प्रिमियम मोटारसायकल क्षेत्रातील ब्रिटीश ब्रँड Triumph येत्या 5 डिसेंबरला ‘रॉकेट 3’ ही आपली नवी दुचाकी भारतात प्रदर्शित करणार आहे.

ही दुचाकी 2500 सीसी क्षमतेची आहे. पुढे 320 एमएम ट्विन डिस्क आणि मागे 300 एमएम डिस्क ब्रेक आहे. काही महिन्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय बाजारात ही दुचाकी लाँच करण्यात आली होती. Triumph च्या भारतातील सहाव्या वर्धापन दिनानिमित्त 5 डिसेंबरला ही बाईक भारतात प्रदर्शित केली जाईल.

आंतरराष्ट्रीय बाजारात ही दुचाकी दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आली आहे. ‘रॉकेट 3 आर’ आणि ‘रॉकेट 3 जीटी’ हे दोन व्हेरिएंट आहेत. यापैकी जीटी व्हेरिएंट जास्त टूरिंग फोकस दुचाकी आहे. मात्र, भारतात दोन्हीपैकी कोणते व्हेरिएंट लाँच होणार याबाबतची अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

Related posts: