|Sunday, January 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » अजित पवारांचा व्हिप राष्ट्रवादीच्या आमदारांना लागू होणार

अजित पवारांचा व्हिप राष्ट्रवादीच्या आमदारांना लागू होणार 

खासदार रावसाहेब दानवे यांचा दावा

मुंबई / प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे गटनेते हे अजित पवार हेच आहेत. अजित पवार व्हिप काढतील तोच राष्ट्रवादीच्या आमदारांना लागू होणार असून राज्यात भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार येणार असल्याचा दावा भाजपचे नेते खासदार रावसाहेब दानवे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केला.

दानवे यांनी भाजपची भूमिका मांडताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार पंचतारांकीत हॉटेलमध्ये असताना भाजपचे आमदार मात्र शेतकऱयांचे प्रश्न समजवून घेत असल्याचे दानवे म्हणाले. यावेळी दानवे यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. सत्ता येण्याची वाट पाहतानाच संजय राऊत यांना वेड लागले आहे. राऊत यांना लवकरच वेडय़ांच्या रुग्णालयामध्ये दाखल करावे लागेल, असेही दानवे  म्हणाले.

भाजपकडून शिवसेनेच्या आमदारांना धमक्या येत असल्याचे राऊत यांनी म्हटले, यावर बोलताना दानवे यांनी हे खोटे असल्याचे सांगताना आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्यावतीने ज्या सिब्बल यांनी न्यायालयामध्ये बाजू मांडली; त्या सिब्बल यांनी राम हे काल्पनिक असून वास्तव नाही असे वक्तव्य केले आहे.  त्यावेळी सिब्बल यांच्याबद्दल टीका करणारा लेख संजय राऊत यांनीच लिहिला होता, अशी टीकाही दानवे यांनी केली.

Related posts: