|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » काँग्रेस विधिमंडळ गटनेतेपदी बाळासाहेब थोरात

काँग्रेस विधिमंडळ गटनेतेपदी बाळासाहेब थोरात 

मुंबई / प्रतिनिधी

काँगेसच्या गटनेतेपदी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची निवड केली. यापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपल्या विधिमंडळ गटनेत्यांची निवड केली होती. काँग्रेसने आपल्या गटनेत्याची निवड न केल्याने भाजपकडून काँग्रेसवर टीका केली जात होती. इतकेच नव्हे तर सोमवारी महाविकास आघाडीने सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांना जे पत्र दिले होते. त्यावर काँग्रेसच्या गटनेत्याची सही नसल्याने हे पत्र ग्राहय़ धरण्यात येऊ नये, असा ही युक्तिवाद भाजपकडून करण्यात आला होता.

शिवसेनेने आपल्या विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीने अजित पवार यांची निवड केली. मात्र, अजित पवारांनी गटनेतेपदाचा वापर करुन राष्ट्रवादीच्या आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्रच राज्यपालांना देऊन भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. त्यामुळे काँग्रेसने गटनेता निवडीचा न घेतलेला निर्णय हा हुशारीचा मानला जात होता. अखेर मंगळवारी सर्वोच्य न्यायालयाने बुधवारी बहुमत सिद्ध करण्याचा निर्णय दिल्यानंतर काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली.

Related posts: