|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » भारतीय संविधान देशाला मिळालेली मोठी देणगी म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर

भारतीय संविधान देशाला मिळालेली मोठी देणगी म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर 

म्हाडामध्ये संविधान दिनानिमित्त संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक  वाचन

मुंबई / प्रतिनिधी

मुंबई, 26 नोव्हेंबर, प्रतिनिधी रू भारतीय संविधानामध्ये प्रदान करण्यात आलेल्या अधिकार व कर्तव्याची माहिती प्रत्येक भारतीयाला असणे गरजेचे आहे. भारतीय संविधान हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली फार मोठी देणगी आहे, असे प्रतिपादन म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी आज केले.

महाराष्ट्र गफहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा)  वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात संविधान दिनानिमित्त संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यावेळी म्हैसकर बोलत होते. म्हैसकर म्हणाले की, भारतीय संविधान जगामध्ये सर्वश्रेष्ठ ठरले आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभुत अधिकार मिळवून दिला आहे म्हणून प्रत्येकाने भारतीय संविधानाप्रती जागरुक असणे गरजेचे आहे. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंर्त्यल्ल्समानता प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने  26 नोव्हेंबर, 1949 रोजी भारताची स्वतंत्र राज्य घटना अंगीकृत व अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण केली. या संविधानाविषयी माहिती जाणून घेणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. तसेच संविधानात नमूद केलेल्या कर्तव्यांचे पालन प्रत्येकाने करणे गरजेचे असल्याचे म्हैसकर यांनी सांगितले.

     यावेळी मुख्य अभियंताल्ल्1 . धीरजकुमार पंदिरकर, मुख्य अभियंताल्ल्2  संजय लाड, मुख्य अभियंता ल्ल्3. सुनील जाधव, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे मुख्य अधिकारी  शहाजी पवार, सहमुख्य अधिकारी  अविनाश गोटे,  वित्त नियंत्रक  विकास देसाई, विधी सल्लागार . पी . बी. वीर, म्हाडाचे सचिव . प्रसाद उकर्डे,  मुख्य जनसंपर्क अधिकारी  वैशाली गडपाले, म्हाडा मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे प्रधान कार्यवाह  एस. के. भंडारे आदींसह अधिकारील्ल्कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.   

वैशाली गडपाले,

मुख्य जनसंपर्क अधिकारी, म्हाडा    

Related posts: