|Saturday, March 28, 2020
You are here: Home » leadingnews » अजित पवारांवर पक्ष नेतृत्वाने विश्वासच का ठेवला? यावर अमित शाहा म्हणाले…

अजित पवारांवर पक्ष नेतृत्वाने विश्वासच का ठेवला? यावर अमित शाहा म्हणाले… 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याची आता केवळ औपचारिकताच बाकी राहिली आहे. मात्र, हे सरकार स्थापन होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यामदतीने सरकार स्थापन केलं होतं. मात्र, चार दिवसांतच हे सरकार कोसळलं, यामागे अजित पवारांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा हे प्रमुख कारण होतं. मात्र, अजित पवारांवर पक्ष नेतृत्वाने विश्वासच का ठेवला? असा सवाल आता भाजपामधूनच विचारला जात आहे.

या प्रश्नावर उत्तर देताना अमित शाहा म्हणाले, अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते असल्यानं भाजपनं त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. पुढे ते म्हणाले, सरकार बनवण्यासाठी ते अधिकृत नेते होते. राज्यपालांनी देखील भाजपाचे सरकार बनवण्याबाबत अजित पवारांशीच चर्चा केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने जेव्हा पहिल्यांदा सरकार बनवण्यास असमर्थता दाखवली होती, तेव्हा देखील त्या पत्रावर अजित पवारांची सही होती. त्यानंतर आमच्याजवळ जे आमदाराच्या पाठींब्याचे पत्र आले होते त्यावर देखील अजित पवारांची सही होती.

 

Related posts: