|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » नवे सरकार कालचे आणि आजचे

नवे सरकार कालचे आणि आजचे 

तीनेक दिवसांपूर्वी महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाल्याची बातमी वाचली. पाच रुपयात अटल भोजन थाळी मिळणार या कल्पनेने तेव्हा मनापासून आनंद झाला होता. पण ते सरकार टिकले नाही आणि आता अधिक नवे सरकार येणार आहे. नव्या सरकारने दहा रुपयात जेवणाची थाळी द्यायचे कबूल केले आहे. 

अधिक नवे सरकार आल्यावर त्यांच्यापुढे विविध प्रश्न असतील. आणि ते सोडवण्याचा सरकार बहुधा प्रयत्न करीलच. प्रश्न जोवर सुटत जातील तोवर सरकार टिकेल. अधिक नवे सरकार आल्यापासून माझ्यासमोर देखील वेगळे प्रश्न उभे राहिले आहेत.

यंदाच्या पेचप्रसंगी विविध पक्षातले आमदार विविध हॉटेलात राहिले होते. विमानातून प्रवास केला होता. ती बिले कोणी दिली? पैसे कुठून आणले? काही काळापूर्वी कर्नाटकमध्ये पेचप्रसंग निर्माण झाला. त्यावेळी काँग्रेसमधून फुटलेले आमदार महाराष्ट्रात पाहुणचार घ्यायला आले तेव्हाही मला हाच प्रश्न पडला होता.

नवे सरकार स्थापन झाल्यावर विरोधी पक्ष नेते कोण होतील? पूर्वीच्या सरकारमध्ये जे सद्गृहस्थ विरोधी पक्ष नेते होते त्यांना अनुभवाचा फायदा मिळून तेच पुन्हा विरोधी पक्ष नेते होतील काय?  

शेतकऱयांच्या प्रश्नांवर किती लवकर उपाय शोधले जातील?

नव्या सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सामील आहेत. आता अण्णा हजारे पुन्हा लोकपाल किंवा अन्य मागण्या घेऊन आमरण उपोषणाला बसतील का? उपोषणाचे काय होईल?

आता मुंबई बीएमसी आणि महाराष्ट्रात एकाच पक्षाची सत्ता आली आहे. आता तरी मुंबई आणि महाराष्ट्रातले रस्ते खड्डेमुक्त आणि टोलमुक्त होतील का? पावसाळय़ात अतिवृष्टी होते तेव्हा मुंबई तुंबणे बंद पडेल का?

तीन दिवसांपूर्वीचे सरकार स्थापन झाले तेव्हा काही लोकांनी फडणवीसांवर आणि काही लोकांनी अजितदादांवर स्तुतीचा आणि टीकेचा वर्षाव केला होता. ते लोक आपले शब्द मागे घेतील काय?  फडणवीस आणि त्यांचे सहकारी आता अजितदादा पवार आणि इतरांवर जलसिंचन किंवा इतर मुद्दे घेऊन आरोप आणि टीका कोणत्या तोंडाने करतील?

आरेतील वृक्षतोडीवर कारवाई करू असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते. ती कारवाई कधी होईल?

आणि माझ्या मनातला लाखमोलाचा प्रश्न दहा रुपयात जेवणाची थाळी कुठे, केव्हा आणि कशी मिळेल?

 

Related posts: