|Friday, January 24, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » एअर इंडियाची विक्री आवश्यक

एअर इंडियाची विक्री आवश्यक 

नागरी उड्डाणमंत्री हरदीप पुरी यांचे विधान

वृत्तसंस्था/  नवी दिल्ली

एअर इंडियाचे खासगीकरण न केल्यास ही कंपनी चालविण्यासाठी निधी कुठून आणणार असे प्रश्नार्थक विधान केंद्रीय नागरीउड्डाणमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी बुधवारी केले आहे. एअर इंडिया सद्यकाळात प्रथम श्रेणीची मालमत्ता असल्याने आताच विक्री केल्यास खरेदीदार समोर येतील. तर विक्रीचा निर्णय टाळल्यास भविष्यात ही कंपनी चालविणे अवघड ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एअर इंडियाच्या तोटय़ाची भरपाई करण्यासाठी यापूर्वी अर्थमंत्रालयाकडे धाव घ्यायचो. पण आता अर्थमंत्रालयाकडून निधी मिळत नसल्याने बँकांकडे धाव घ्यावी लागणार आहे. एअर इंडियाच्या 11 हजार पूर्णवेळ तर 4 हजार कंत्राटी कर्मचाऱयांसोबत न्याय व्हावा यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. एअरलाइन्स खरेदी करणाऱयाला प्रशिक्षित कर्मचाऱयांची गरज भासणार असल्याचे पुरी यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने मागील वर्षीही एअरलाइन्सच्या विक्रीचा प्रयत्न केला होता, पण योग्य खरेदीदारच मिळू शकला नव्हता. लिलावासाठी कठोर अटी लादण्यात आल्याने खरेदीदार समोर न आल्याचे मानले गेले होते.

Related posts: