|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » महाराष्ट्रातच प्रथमच लघु श्रीविष्णूसहस्त्रनाम सोहळा

महाराष्ट्रातच प्रथमच लघु श्रीविष्णूसहस्त्रनाम सोहळा 

पुणे / प्रतिनिधी :

ग्रंथ पारायण दिंडी पुणे, निनाद पुणे, गीता फाऊंडेशन मिरज, श्री भगवंंत देवस्थान ट्रस्ट, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने लघु श्रीविष्णूसहस्त्रनाम पठण सोहळा आणि श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ  व स्वाहाकार सोहळ््याचे आयोजन करण्यात आले आहे. बार्शी येथील भगवंत देवस्थान मंदिर येथे दिनांक २९ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०१९ दरम्यान हा सोहळा होणार आहे. महाराष्ट्रात प्रथमच भगवंतांना १ लक्ष तुळशीपत्र अर्पण सोहळा होत आहे. पुण्यातील संस्था या उपक्रमाचे संयोजक आहेत, अशी माहिती ग्रंथ पारायण दिंडीचे विरेंद्र कुंटे यांनी दिली. 

पुण्यातील विविध संस्थानी एकत्र येत प्रथमच अशा भव्य सोहळ््याचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातील पारमार्थिक क्षेत्रात विख्यात असेलेले श्री विष्णूंचे भगवंत या नावाने पुराण प्रसिद्ध असलेल्या बार्शी या स्थानी श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा व स्वाहाकार सोहळा संपन्न होणार आहे. ग्रंथ पारायण दिंडीचे विरेंद्र कुंटे, श्री भगवंंत देवस्थान ट्रस्ट, बार्शीचे दादासाहेब बुडुख, निनाद पुणेचे उदय जोशी, गीता फाऊंडेशन मिरजचे आपटेकाका यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. 

शुक्रवार, दिनांक २९ नोव्हेंबर रोजी श्रीविष्णूसहस्त्रनाम पठण आणि भगवंतांना १ लक्ष तुळशीपत्र अर्पण सोहळा होणार आहे. तसेच सहस्त्रनाम हा विषयावर प्रणव गोखले यांचे प्रवचन होणार आहे. दिनांक ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान भार्गव गाडगीळ यांचे संहिता वाचन तसेच राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे श्रीमद भागवत कथेवर निरुपण करणार आहेत. दिनांक ७ डिसेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान श्रीमद भागवत दशमस्कंध स्वाहाकार सोहळा होणार आहे. माहितीकरीता ९४२३००१३५२ या क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने यात  सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts: