|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » नवा वाहतूक कायदा 2020 मध्ये अंमलात आणू नये

नवा वाहतूक कायदा 2020 मध्ये अंमलात आणू नये 

प्रतिनिधी

मडगाव

गोव्यातील रस्त्यांची परिस्थिती एकदम वाईट आहे. त्यात नवा वाहतूक कायदा 2020 मध्ये अंमलात आणून जनतेला त्रास करू नका अशी मागणी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. आपण या संदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

रस्ते ठीक नसतानाच नवा वाहतूक कायदा असा काय अंमलात आणला जातो असा सवाल अनेकांनी उपस्थित केलेला आहे. नव्या वाहतूक कायद्यात, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असून आकारण्यात येणारा दंड हा अवाजवी असल्याचा आरोप ही श्री. लॉरेन्स यांनी केला आहे. वाहतूकमंत्रा माविन गुदिन्हो हे गुजरात पॅटर्नचा उल्लेख करतात. मात्र, गुजरात पॅटर्न त्यांना महाराष्ट्रात बऱयापैकी कळून चुकला आहे. तोच पॅटर्न गोव्यात आणून आणखीन परिस्थिती वाईट करून घेऊ पहात आहे का ? असा सवाल ही उपस्थित केला.

गोव्यातील रस्त्यांना पडलेले खड्डे अद्याप व्यवस्थित बुजविण्यात आलेले नाही. वाहन पार्किग सुविधा नाही. कुठ्ठाळी जंक्शनवर काय चाललेय हे सर्वांना ठावूक आहे. रस्त्यावर दुभाजक घातले म्हणून समस्या सुटत नाही. पोलीस तैनात करून तसेच कॅमेरा बसवून समस्या सुटत नाही. त्यासाठी अगोदर सर्व रस्ते वाहन चालविण्यास योग्य बनवावे व नंतरच नव्या वाहतूक कायद्याचा विचार करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. भाजप सरकारकडून गरीब जनतेला छळले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सोनसडा प्रश्नी श्रेय घेण्याचे बंद करा

सोनसोडय़ाचा प्रश्न सोडविणे ही काळाची गरज आहे. मात्र, या प्रश्नावर कुणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असा सल्ला आमदार लॉरेन्स यांनी दिला आहे. सोनसडा कचऱयावर बायोरेमेडिएशन प्रक्रिया केली जाणार आहे. ही लांब पल्ल्याची प्रक्रिया आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी झाली असता, आपण हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. त्यात राय परिसरात कोणत्याच प्रकारचा कचरा किंवा बायोरेमेडिएशन होता कामा नये असे न्यायालयाला कळविण्यात आले आहे. आपल्या मतदारांवर कोणताच अन्याय होऊ दिला जाणार नाही. लोकांचे हित जपणे आपले कर्तव्य असल्याचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपण विरोधी पक्षात असून प्रभावी विरोधकांची भूमिका बजावणार असल्याचे आपण मुख्यमंत्र्यांना देखील सांगितल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सोनसोडय़ावर बायोरेमेडिएशन करण्यास आपला पूर्ण पाठिंबा असून आपण मंत्री मायकल लोबो यांनी ही तशे आश्वासन दिले आहे. जर कुणी विरोध केला तर आपण स्वता त्या ठिकाणी उभा राहून मदत करणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, सोनसोडय़ाच्या प्रश्नावर कुणीही श्रेय घेऊ नये असा सल्ला त्यांनी दिला.

Related posts: