|Sunday, January 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म्हादई नदीचा बळी देऊन सरकारचे गोव्यात वाळवंट करण्याचे षडयंत्र

म्हादई नदीचा बळी देऊन सरकारचे गोव्यात वाळवंट करण्याचे षडयंत्र 

वाळपई प्रतिनिधी :

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कर्नाटक भागातील कळसा भांडुरा प्रकल्प उभारण्यासाठी दिलेल्या परवानगीमुळे आज म्हादई नदीवर मोठे संकट निर्माण झाले आहे.

 या संकटातून गोव्यातील एकही गाव सुटणार नसून त्याचा पहिला धक्का सत्तरी तालुक्मयाला बसणार आहे .त्यामुळे सर्व प्रकारचे मतभेद विसरून म्हादई बचाव आंदोलनाच्या याहोमकुंडात सर्वांनी आपल्यापरीने योगदान देणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा याचे गंभीर परिणाम येणाऱया काळात आपल्या संपूर्ण परिस्थितीवर निर्माण होणार असून यातून कोणाचीही सुटका होणार नसल्याचे निवेदन म्हादई आंदोलनातर्फे घेण्यात आलेल्या सभेत करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून वाळपईचे आमदार गोवा राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे व माजी मुख्यमंत्री तथा पर्ये मतदारसंघाचे आमदार प्रतापसिंह राणे कमालीचे  मौनव्रत धारण करीत असल्यामुळे येणाऱया काळात सत्तरीवासियांना खरोखरच संकटात लोटायचा त्यांचा विचार आहे का अशा प्रकारचा प्रश्न या आंदोलनाच्या माध्यमातून विविध वक्त्या?नी व्यक्त केला आहे.

 वाळपई नगरपालिका व्यासपीठावर आयोजीत करण्यात आलेल्या या सभेत  बचाव आंदोलनाचे प्रमुख निमंत्रक अरविंद भाटीकर संयोजक एल्वसि गोम्स आंदोलनाचे प्रमुख सुभाष भास्कर वेलिंगकर सत्तरी तालुका गोवा सुरक्षा मंच अध्यक्ष राम ओझरेकर गोवा शालांत मंडळाचे माजी अध्यक्ष तथा शिक्षण तज्ञा डॉक्टर पांडुरंग नाडकर्णी सामाजिक कार्यकर्त्या ?ड. स्वाती केरकर स्नेहलता भाटीकर श्री मारिया कोर्तेरो व इतरांची खास उपस्थिती होती. मोठय़ा संख्येने उपस्थित असलेल्या या सभेत कर्नाटक सरकारने कळसा-भांडुरा माध्यमातून नदीचे पाणी वळविल्यास कोणत्या प्रकारे गोवा राज्यावर प्रतिकूल परिणाम होणार या संदर्भात सविस्तर माहिती दिली.

 सरकार दबावाचे राजकारण करत आहे–  अरविंद भाटीकर

ज्ये÷ विचारवंत व आंदोलनाचे प्रमुख निमंत्रक अरविंद भाटीकर यांनी यावेळी बोलताना केंद्रसरकार गोवा राज्य व दबावाचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला. गोव्यात भाजपाचे सरकार आहे व या सरकारवर मोठय़ा प्रमाणात दबाव घालून कर्नाटक सरकार कणकुंबी याठिकाणी कळसा-भांडुरा प्रकल्प उभारण्यासाठी पर्यावरण दाखला देण्यासंदर्भात हातमिळवणी करीत असल्याचा आरोप केला .यातून जनतेला मोठय़ा प्रमाणात दिशाभूल करण्याचे राजकारण सध्या  गोवा सरकारने केले असून हा डाव सर्वसामान्य जनतेने वेळीच ओळखून नदीच्या रक्षणासाठी संघर्ष करण्यासाठी एकसंघ होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

 

Related posts: