|Sunday, January 19, 2020
You are here: Home » Top News » ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांना ‘तन्वीर सन्मान’

ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांना ‘तन्वीर सन्मान’ 

 

 पुणे / प्रतिनिधी :

ज्ये÷ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचा मुलगा तन्वीर याच्या स्मरणार्थ रुपवेध प्रति÷ानच्या वतीने देण्यात येणारा ‘तन्वीर सन्मान’ ज्ये÷ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना तर, ‘तन्वीर नाटय़धर्मी पुरस्कार’ ‘महाराष्ट्र कल्चरल सेंटर’ या संस्थेला जाहीर करण्यात आला असल्याची माहिती रुपवेध प्रति÷ानच्या कार्यवाह दिपा लागू यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तर, तीस हजार रुपये आण्sिा सन्मानचिन्ह असे ‘तन्वीर नाटय़धर्मी पुरस्कारा’चे स्वरुप आहे. येत्या 9 डिसेंबर ला यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे सायंकाळी 6.30 वाजता ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्ये÷ अभिनेते श्रीराम लागू, रत्ना पाठक उपस्थित राहणार आहेत.

शाह हे चित्रपट आणि रंगभूमीवर अनेक वर्षे कार्यरत आहेत. कालसुसंगत, नव्या जाणिवांची इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भोषतील नाटकांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. शाह यांना ‘पद्मश्री’ आणि ‘पद्मभूषण’ या किताबांनी गौरविण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र कल्चरल सेंटर’ ही 25 वर्षांपासून अधिक काळ प्रायोगिक रंगभूमीसाठी काम करते. सुदर्शन रंगमंच आणि ज्योत्स्ना भोळे सभागृह ही दोन सभागृहे कलाकारांसाठी खुली असतात. नाटकांबरोबरच संगीत, नृत्य, चित्रकला आदी उपक्रम केले जातात.

 

 

Related posts: