|Sunday, January 19, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » रेल्वे अपघातांमध्ये दोन वर्षात घट

रेल्वे अपघातांमध्ये दोन वर्षात घट 

नवी दिल्ली

 गेल्या दोन वर्षात रेल्वे अपघातांमध्ये घट झाल्याचे प्रतिपादन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राज्यसभेत शुक्रवारी केले आहे. प्रश्नोत्तर तासात त्यांनी केंद्र सरकारच्या उपाययोजनांची माहितीही दिली. रियल टाईम टेन इन्फॉर्मेशन सिस्टिम क्रियान्वित केल्यामुळे रेल्वे अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही यंत्रणा इस्रोच्या सहकार्याने भारतातच विकसित करण्यात आली आहे. ही यंत्रणा सर्व रेल्वेगाडय़ांमध्ये बसविण्यासाठी रेल्वे विभागाने मोठी मोहीम हाती घेतली असून वर्षभरात उपनगरी रेल्वेगाडय़ांसह सर्व गाडय़ांमध्ये बसविण्यात येईल. अपघात घडण्याच्या शक्मयतेची पूर्वसूचना देण्याची क्षमता या यंत्रणेत आहे. गेल्या दोन वर्षात अनेक मोठे अपघात रोखण्यात यश आल्याचे गोयल यांनी प्रतिपादन केले.

Related posts: