|Saturday, January 25, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » विधीविज्ञान प्रयोगशाळेत स्फोटकांचा स्फोट

विधीविज्ञान प्रयोगशाळेत स्फोटकांचा स्फोट 

5 तज्ञांसह एकूण 7 जण जखमी : स्फोटकांची तपासणी करताना दुर्घटना

प्रतिनिधी/ बेंगळूर

बेंगळूरमधील मडिवाळ येथे असलेल्या विधीविज्ञान प्रयोगशाळेत शुक्रवारी स्फोटकांच्या तपासणीवेळी स्फोट झाला. या घटनेत 5 तज्ञांसह एकूण 7 जण जखमी झाले. ही दुर्घटना दुपारी 3.40 च्या सुमारास घडली. जमखींना सेंट जॉन्स इस्पितळात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक परशिव मूर्ती यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी रायचूर येथे स्फोटके आढळून आली होती. भंगार गोळा करणाऱयांना ही स्फोटके सापडली होती. पोलिसांनी 25 ग्रॅम वजनाची अशी 9 स्फोटके तपासणीसाठी विधीविज्ञान प्रयोगशाळेकडे पाठविली होती. प्रयोगशाळेमध्ये त्यांची तपासणी होत असताना 25 ग्रॅम स्फोटकांचा स्फोट झाला. त्यामुळे 6 जण जखमी झाले. नव्व्या, विश्वनाथ, श्रीनाथ, विष्णू, वल्लभ, बसवराज प्रभू तसेच नेत्रावती दलायत, ऍन्थोनी दलायत अशी स्फोटात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

स्फोटानंतर तेथील रसायनांनी पेट घेतला. त्यामुळे अग्नीशमन उपकरणांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. घटनास्थळी बेंगळूर पोलीस आयुक्त भास्करराव, डीसीपी इशा पंत यांच्यासह पोलीस अधिकाऱयांनी भेट देऊन पाहणी केली.

 

Related posts: