|Sunday, January 19, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » बेंगळूरमध्ये 1 कोटीचे अमली पदार्थ जप्त

बेंगळूरमध्ये 1 कोटीचे अमली पदार्थ जप्त 

विदेशातून कुरियने हायड्रो गांजा मागविणारा गजाआड

प्रतिनिधी/ बेंगळूर

सोन्यापेक्षा महाग असलेल्या हायड्रो गांजा मिल्क पावडर डब्यातून कुरियरमार्फत आणून प्रतिष्ठित शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अवैधपणे विक्री करणाऱया भामटय़ाला पोलिसांनी अटक केली आहे. अतिफ सलीम (वय 26) असे त्याचे नाव आहे. त्याच्याजवळून 1 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

अटकेतील आरोपी अतिफ सलीम हा मुळचा कोलकाता येथील आहे. तो बीसीए पदवीधर आहे. बेंगळूरच्या सुद्दगुंटे येथे अपार्टमेंटमध्ये भाडोत्री खोली घेऊन विदेशातून अमली पदार्थ मागवून वेगवेगळय़ा प्रकारे पॅकिंग करत होता. त्याच्याजवळून 12 चॉकलेट पाकिटे, ई-शिगारेटच्या 100 टय़ूब, गांजा पावडर तयार करण्याच्या तीन मशीन, स्कोडा कार, केटीएम डय़ूक दुचाकी, वजनमापन यंत्र, 1 लाख रुपये रोख असा ऐवज जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती बेंगळूर शहर पोलीस आयुक्त भास्करराव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘डार्कवेब’ या वेबसाईटवरून तो ऑनलाईनद्वारे कॅनडामधील अमली पदार्थ व्यापाऱयांशी संपर्क साधत होता. ‘मरीजुना’ (हायड्रो गांजा) नामक अमली पदार्थ ऍमेझॉनवरून कुरियरद्वारे भारतात पाठविण्यात येत होते. हायड्रो गांजा इतरत्र वितरीत करण्याची जबाबदारी अतिफ सलीमवर होती. हायड्रो गांजाची प्रतिग्रॅम 3 ते 4 हजार रुपयांनी विक्री केली जात होती. हे पदार्थ ऍमेझॉनच्या पाकिटातून डीटीडीसी कुरीयरने विमानातून येत असल्यामुळे अबकारी विभागाला याचा सुगावा लागत नव्हता.

केवळ मिल्क पावडरच्या डब्यातूनच नव्हे तर गांजा चॉकलेटमधून तर हशीश ई-सिगारेटच्या टय़ूबमधून खरेदी केले जात होते. अतिफ विदेशातून आलेल्या अमली पदार्थापैकी एक तृतीयांश भाग स्थानिक युवकांना विक्री करीत होता. तर उर्वरित कुरीयरच्या माध्यमातून आपल्या नेहमीच्या ग्राहकांना बेंगळूर शहर व इतर भागात पाठवून देत होता.

अलिकडे 2 किलो 750 गॅम वाजनाचे 14 हायड्रो गांजाची पाकिटे मिल्क पावडरच्या डब्यातून मागविण्यात येत होती. ग्राहकांची संख्या वाढविण्यासाठी अतिफ धनाढय़ांना चॉकलेट किंवा जेली चॉकलेटची विक्री करीत होता. यामुळे मुलांची बौद्धिक क्षमता वाढते, असे सांगून फसवणूक करीत होता. चॉकलेटमुळे मुलांच्या वर्तनात फरक पडल्याने पालकांना संशय आला. त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे सीसीबी पोलिसांनी विदेशी अमली पदार्थविक्रीचा पर्दाफाश केला. बेंगळूरमधील अनेक हुक्काबार, बार ऍन्ड रेस्टॉरंटमध्ये त्यांचा पुरवठा केला जात होता, अशी माहिती देखील या कारवाईनंतर उघड झाली आहे. अतिफविरुद्ध सुद्दगुटेपाळय़ पोलीस स्थानकात एनडीपीएस कायदा 1985 च्या कलम 8 क, 2 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related posts: