|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ‘लोकमान्य’ कराड शाखेचा वर्धापनदिन उत्साहात

‘लोकमान्य’ कराड शाखेचा वर्धापनदिन उत्साहात 

मोफत पीयुसी कॅम्पला मोठा प्रतिसाद, शाखेत स्नेहमेळावा

प्रतिनिधी/ कराड

लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या येथील शाखेचा पाचवा वर्धापनदिन ठेवीदार, ग्राहक, हितचिंतकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने शाखेत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मोफत टू व्हीलर, फोर व्हीलर पीयुसी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. सहारा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. इसाक इनामदार, आर्किटेक्ट प्रकाश काळे, एक्झिक्युटीव्ह इंजिनिअर नरेंद्र आंधळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

लोकमान्य सोसायटीचे रिजनल मॅनेजर हर्षद झोडगे आपल्या मनोगतात म्हणाले, की लोकमान्य सोसायटीची यशस्वी घोडदौड सुरू आहे. लोकमान्य सोसायटीने 4850 कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामध्ये पुणे विभागाचे 1170 कोटीचे योगदान आहे. कराड शाखेने अल्पावधीत पाच वर्षांत 20 कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला आहे. हे सर्व कराड शाखेच्या परिसरातील नागरिक, ठेवीदार, ग्राहकांच्या सहकार्यामुळेच शक्य झाले आहे. हे सहकार्य भविष्यातही रहावे. संस्थेच्या जनरल इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, पर्यटनासाठी क्वेस्ट टुर्स, लॉकर सुविधा या सुविधांचाही लाभ घ्यावा.

वर्धापन दिनानिमित्त शाखेने 50 टक्के सवलतीच्या दरात लॉकर्स सुविधा उपलब्ध केली होती. याचा लाभ ग्राहकांनी मोठय़ा संख्येने घेतला. ग्राहकांच्या आग्रहास्तव या योजनेची मुदत 15 डिसेंबर 2019 पर्यंत वाढवण्यात आली. कार्यक्रमात चालू महिन्यात वाढदिवस असणाऱया ठेवीदार, ग्राहकांचा एकत्रित केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. क्वेस्ट टुर्समधून थायलंड, मलेशिया, सिंगापूरला कराडमधून जाणाऱया दहा जणांच्या ग्रुपला हर्षद झोडगे यांच्या हस्ते प्रवासी बॅगचे वितरण करण्यात आले.

इसाक इनामदार म्हणाले, लोकमान्य सोसायटीच्या व्याजदराच्या विविध आकर्षक  योजना असून याचा लाभ सर्वांनी घ्यावा. सोसायटी विविध सामाजिक उपक्रम राबवते, ही अभिमानाची बाब आहे. सध्याच्या काळात मुले आई-वडिलांचे वाढदिवस साजरे करण्यास विसरतात. आपल्या धावपळीत, मोबाईलमध्ये मग्न असतात. मात्र, लोकमान्य सोसायटीने ठेवीदारांचा वाढदिवस एकत्रित साजरा करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

प्रास्तविक शाखाधिकारी प्रशांत काळे यांनी केले. सचिन खोत यांनी आभार मानले. यावेळी मार्केटींग मॅनेजर आदित्य भेंडे, वरिष्ठ शाखाधिकारी सुनील मोरे, मदन जाधव, सागर शेजवळ, विशाल मोहिते, अतुल पवार, नीलेश जाधव, प्राजक्ता जाधव, रवी साळुंखे, दत्तात्रय इंगुळकर, रविराज मोरे, अक्षय साळुंखे, क्वेस्ट टुर्सचे रोहन वनारे, अश्विनी जाधव उपस्थित होते.::

Related posts: