|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आघाडीबाबत पंधरा दिवसानंतरच निर्णय

आघाडीबाबत पंधरा दिवसानंतरच निर्णय 

मगो नेते सुदिन ढवळीकर यांची माहिती

प्रतिनिधी/ पणजी

मगोनेते सुदिन ढवळीकर यांनी आणखी 15 दिवस वाट पाहून नंतरच आघाडीबाबत निर्णय घेण्याचे ठरविले आहे.

या प्रतिनिधीशी बोलताना माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले की, आपल्याला मुंबईहून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांचा फोन आला व महाराष्ट्राच्या  धर्तीवर गोव्यातही महाविकास आघाडी करण्याचा इरादा व्यक्त केला. आपण ही कल्पना चांगली आहे. परंतु त्यावर निर्णय घेण्यास योग्य वेळ लागेल असे त्यांना कळविलेले आहे.

 भाजपकडून मगोला खूप त्रास

 आपले दोन आमदार भाजपने फोडून आत घेतले. मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना भाजप नेत्यांनी फार त्रास दिला. आपण दाखल केलेल्या याचिकेवर सभापती             कित्येक महिने बसून आहेत. सभापती जर टाळाटाळ करीत असतील तर आपल्याला यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागतील. परंतु भाजपकडून आपल्याला काही गोष्टींचे स्पष्टीकरण हवे आहे. त्यासाठी आपण 6 महिने वाट पाहिन आणि नंतरच निर्णय घेणार असे जाहीर केले होते. त्यानुसार आता आणखी केवळ 15 दिवस शिल्लक आहेत. त्या कालावधीमध्ये भाजपकडून आपल्याला उत्तर मिळाले नाही तर मग माझा मार्ग मी पत्करीन, असे ते म्हणाले.

 मुख्यमंत्र्यांकडून हवेय स्पष्टीकरण

मगो पक्ष आता या सरकारमध्ये नाही. परंतु, आम्ही अद्याप विरोधकांबरोबर हात मिळवणी केलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला काही गोष्टींचे स्पष्टीकरण द्यायचे आहे. आपण त्या पक्षाच्या नेत्यांना देखील सांगितले होते. त्यांच्याकडून उत्तर येण्यासाठी 15 दिवस शिल्लक आहेत. त्यानंतरच आघाडीत सहभागी होणे व त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात जाणे हे दोन्ही मार्ग आपल्याला खुले असल्याचे ढवळीकर म्हणाले. म्हादई संदर्भातही आमची भूमिका 15 दिवसांत जाहीर करू असेही त्यांनी सांगितले.

Related posts: