|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » क्रिडा » राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेसाठी साक्षी व्यवहारेची निवड

राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेसाठी साक्षी व्यवहारेची निवड 

पुणे / प्रतिनिधी : 
ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स अँड सायन्समधील ११ वी कॉमर्स शाखेची विद्यार्थिनी असलेल्या साक्षी व्यवहारे हिने  शालेय फिल्ड आर्चरी स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेत स्थान मिळविले आहे. ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सागर उल्हास ढोले पाटील व सचिव उमा ढोले पाटील यांनी तीचे अभिनंदन केले.
शालेय फिल्ड आर्चरी स्पर्धा उजनी हॉल, मोडनिंब, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आली होती. साक्षी ही क्रीडा प्रशिक्षक दीपक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. १९ वर्षे वयोगटात तिने स्पर्धेत सहभाग घेतला होता. ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्सचे प्राचार्य विठ्ठल गायकवाड प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी तीचे कौतुक केले. 

Related posts: