|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » संजयमामा सरकारच्या बाजूने तर राऊत विरोधात

संजयमामा सरकारच्या बाजूने तर राऊत विरोधात 

पंढरपूर / प्रतिनिधी

राज्याच्या विधीमंडळात आज विश्वासदर्शक ठराव संमत झाला. यामधे जिल्हयातील दोन अपक्षांपैकी एक सरकारच्या बाजूने तर एक विरोधात राहीले. यामधे उध्दव ठाकरे सरकारला यापूर्वीच दिलेल्या शब्दांप्रमाणे आमदार संजयमामा शिंदे यांनी पाठींबा दिला. तर बार्शीच्या आमदार राजेंद्र राऊत यांनी भाजपावरील निष्ठा कायम ठेवली.  

 राज्यात अनेक नाटयमय घडामोडीनंतर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले. यानंतर या सरकारची बहुमत चाचणी आज पूर्ण झाली. यामधे सोलापूर जिल्हयातील भाजपाचे आमदार वगळता कॉग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांनी ठाकरे सरकारला पाठींबा दिला. यामधे दोन अपक्ष आमदारांपैकी करमाळयांचे आ. संजयमामा शिंदे यांनीही ठाकरे सरकारला पाठींबा दिला.

वास्तविक पाहीले तर आ. संजयमामा शिंदे यांनी यापूर्वीच ज्या मुख्यमंत्र्याचे सरकार येईल. त्याच सरकारला आपला पाठींबा असेल. असे जाहीर केले होते. यामधेच आज संजयमामा शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्या सरकारला आपला पूर्ण पाठींबा जाहीर केला. आणि बहुमत चाचणीत सरकारच्या बाजूने अनुकुलता दर्शवली. त्यामुळे संजयमामा शिंदे यांचा पुन्हा राष्ट्रवादींच्या गोटात शिरकाव झाल्यांचे दिसून आले आहे.

तर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मात्र देंवेद्र फडणवीस पर्यायाने भाजपा जवळच आपली निष्ठा कायम ठेवल्यांचे दिसून आले. त्यामुळे जिल्हयात भाजपाच्या सुभाष देशमुख , विजयकुमार देशमुख , सचिन कल्याणशेटटी , राम सातपुते यांच्यासोबत आगामी काळात राजेंद राऊत देखिल असताना दिसून येणार आहेत.

एकंदर पाहीले तर गेल्या तीन वर्षात संजयमामा शिंदे , राजेंद्र राऊत हे भाजपाच्या झेंडयाखाली समविचारी आघाडी म्हणून एकत्र होते. मात्र लोकसभा निवडणुकीत संजयमामा हे राष्ट्रवादीत गेले. अणि निवडणुक लढले. यानंतर विधानसभेला देखिल संजयमामा हे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार होते. यानंतर राऊत आणि शिंदे या दोघांनीही फडणवीस यांना पाठींबा जाहीर केला होता. मात्र यानंतरच्या बदलत्या राजकीय स्थित्यंतरात संजयमामा यांनी मुख्यमंत्र्याला आपला पाठींबा असेल असा जाहीर शब्द दिला होता. तसा शब्द संजयमामानी आज विधीमंडळात पाळला.

Related posts: