|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » हैद्राबाद अत्याचार प्रकरण : रत्नागिरीत अभाविपकडून तीव्र निदर्शने

हैद्राबाद अत्याचार प्रकरण : रत्नागिरीत अभाविपकडून तीव्र निदर्शने 

रत्नागिरी/प्रतिनिधी

हैद्राबाद येथे डॉ. प्रियांका रेड्डी या महिलेवर झालेल्या अमानुष बलात्कार आणि हत्येविरोधात शनिवारी अभाविप रत्नागिरी शाखेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. या घटनेप्रकरणी गुन्हेगारांविरोधातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी देखील अभाविपकडून करण्यात आली. रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सातत्याने अशा घटनांविरोधात न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला आहे. यावेळी अभाविप न्याय मिळवण्यासाठी तीव्र संघर्ष करेल, हा विश्वास व्यक्त करण्यात आला. लाजिरवाणी बाब म्हणजे या घटनेपासून 100 मीटर लांब पुन्हा अशीच एक घटना घडून प्रशासनाने पेट्रोलिंग केलेले नाही. सीसीटिव्ही फुटेजमध्ये घटना कैद होऊनही प्रशासनाने कोणतीही हालचाल केली नसल्याचे अभाविपचे म्हणणे आहे. 

यावेळी या निर्दशनात रत्नागिरी जिल्हा संयोजक इशा फाटक, जिल्हा कार्यालय मंत्री सिमीन हाकीम, रत्नागिरी जिल्हा सहसंयोजक राहुल राजोरीआ, शहरमंत्री हृषीकेश वैद्य, संकेत मुळ्ये, कार्यालय मंत्री तेजस खरे, महाविद्यालय अध्यक्ष प्रसाद जांगळे, कार्यकारिणी सदस्य साईजित शिवलकर, यश खेर, पवन श्रीनाथ, रिद्धी आचरेकर, रुतिका पालकर, गोविंद परब, अक्षत जंगम तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts: