|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » नाना पटोलेंची निवड बिनविरोध?

नाना पटोलेंची निवड बिनविरोध? 

विधानसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक

भाजपकडून किसन कथोरेंचा अर्ज सादर

विश्वासदर्शक ठराव जिंकल्याने भाजप माघार घेण्याची शक्यता

मुंबई / प्रतिनिधी

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव जिंकल्याने विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे नाना पटोले यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपने किसन कथोरे यांचा अर्ज भरला आहे. परंतु, शेवटच्या क्षणी भाजप माघार घेऊ शकते.

आज, शनिवारपासून सुरू झालेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने विदर्भातील आमदार नाना पटोले यांना उमेदवारी दिली आहे. पटोले यांनी शनिवारी सकाळी विधिमंडळ सचिवांच्या दालनात जाऊन अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. महाराष्ट्र विकास आघाडीकडे बहुमत असतानाही भाजपने तूर्तास अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी भाजपने मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांना रिंगणात उतरवले आहे.

आज, रविवारी सकाळी 11 वाजता अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी म्हणजे सकाळी 10 वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. भाजपने अध्यक्षपदासाठी गुप्त पध्दतीने मतदान घेण्याची मागणी केली आहे. नियमानुसार अध्यक्षपदासाठी गुप्त पध्दतीने निवडणूक होती. भाजपची मागणी  मान्य झाली तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीची कसोटी लागेल. मात्र, भाजपची मागणी दुर्लक्षित करून अध्यक्षपदासाठी खुले मतदान घेतले जाऊ शकते.

‘विधानसभा अध्यक्षपदासाठी माझ्या नावाची निवड केल्याबद्दल सगळय़ांचे आभार. मी महाराष्ट्राची परंपरा कायम ठेवीन. अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्राच्या जनतेला विधानसभेतून न्याय मिळवून देईन’

नाना पटोले

काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार

Related posts: