|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » इंद्राणीच्या जामीन अर्जावर 10 डिसेंबर रोजी सुनावणी ?

इंद्राणीच्या जामीन अर्जावर 10 डिसेंबर रोजी सुनावणी ? 

विशेष न्यायालय अंतिरम आदेश देण्याची शक्यता

मुंबई / प्रतिनिधी

शीना बोरा हत्येप्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीच्या जामीन अर्जावर येत्या 10 डिसेंबर रोजी विशेष सीबाआय न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. तेव्हा सदर प्रकरणी न्यायालय अंतरिम आदेश देण्याची शक्यता आहे.

इंद्राणी शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. तिचा जामीन अर्ज सीबीआय न्यायालयाने तीनवेळा नाकारलेला असतानाच साधारणतः सहा महिन्यांपूर्वी इंद्राणीने प्रकृती स्वास्थाच्या कारणावरून अजून एक जामीन अर्ज केला होता. इंद्राणीची प्रकृती खालावत जात असून तज्ञ डॉक्टरांकडून उपचार होणे अत्यावश्यक आहे. त्या अर्जावर शनिवारी न्या. जे. सी. जगदाळे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा तुरुंगात तिच्यावर योग्य उपचार होऊ शकणार नाहीत. तसेच नोव्हेंबर 2018 मध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे इंद्राणीची दर तीन महिन्यांनी वैद्यकीय तपासणीही झालेली नाही, असा दावा तिचे वकील ऍड. अहमद यांनी केला. या खटल्यातील 36 साक्षीदारांच्या साक्षी तपासल्या असून अद्याप पीटर मुखर्जीचा मुलगा राहुलची महत्त्वाची साक्ष नोंदवलेली नाही. त्यामुळे इंद्राणीला जामीन दिल्यास ती राहुलसह अन्य साक्षीदारांवर दबाव आणून शकते. त्याचा परिणाम खटल्यावर होऊ शकतो, असा युक्तिवाद सीबीआयच्या वकिलांनी पुन्हा एकदा केला.

त्यावर न्यायालयाने सुनावणी 10 डिसेंबरपर्यंत तहकूब केली असून त्यावर अंतरिम आदेश देण्याची शक्यता आहे. इंद्राणीवर एप्रिल 2012 मध्ये मुलगी शीना बोरा यांच्यासह इतर दोन आरोपींच्या हत्येचा आरोप आहे. ऑगस्ट 2015 मध्ये तिच्या चालक श्यामवर रायला या प्रकरणात अटक केल्यानंतर त्याने गुह्याची कबुली दिली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. यामुळे इंद्राणी आणि तिचा पूर्वीचा पती संजीव खन्ना यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी इंद्राणीचा पती पीटर मुखर्जी यांना नंतर हत्येच्या कटात सहभागी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तेव्हापासून इंद्राणी कारागृहात आहे.

Related posts: