मुंबई ढगाळ तर राज्यात पावसाचा अंदाज

किमान तापमानही वाढले
मुंबई / प्रतिनिधी
मागील आठवडय़ाच्या सुरुवातीला मुंबईत पहाटे गारवा वाटत असतानाच अचानक किमान आणि कमाल तापमान वाढल्याने उष्मा जाणवू लागला आहे. आगामी दोन दिवस मुंबईत ढगाळ तर राज्यात पावसाचा अंदाज मुंबई वेधशाळेकडून वर्तविण्यात आला आहे.
थंडी अवतरेल असे वाटत असतानाच अचानक वातावरणात बदल झाला आहे. शनिवारी सायंकाळी ढगाळ वातवरणाला सुरुवात झाली. यावेळी मुंबईतील किमान तापमान सरासरी 23 अंश सेल्सिअस एवढय़ावर होते. तर कमाल तापमान पुन्हा 34 अंश सेल्सिअस एवढय़ावर पोहचले. त्यामुळे वातावरणत उष्मा जाणवत होता. आगामी दोन †िदवस मुंबई आणि परिसरासाठी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्याचा अंदाज : राज्यात आज, 1 डिसेंबर व उद्या 2 डिसेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज करण्यात आला आहे. तर 3 डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्र वगळून कोकण आणि गोव्यात तुरळक पावसाचा अंदाज कायम ठेवण्यात आला आहे.
प्रतिक्रिया
‘उशिरापर्यंत लांबलेला पाऊस हे यावर्षी दिसून येणारे कारण आहे. मात्र्। ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामातून हवामानाच्या घटकांवर परिणाम होत आहे. कमी दाबाचा पट्टा अद्यापही क्रियाशील असल्याचे दिसून येत आहे. पावसाचा अंदाज त्यातून वर्तविण्यात आला आहे.’
– अंकुर पुराणिक, हवामान अभ्यासक