|Sunday, January 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » संमेलन ग्रंथप्रदर्शनासाठी अर्जाचे आवाहन

संमेलन ग्रंथप्रदर्शनासाठी अर्जाचे आवाहन 

 उस्मानाबाद / प्रतिनिधी :

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 10, 11 आणि 12 जानेवारी, 2020 रोजी उस्मानाबाद येथे होत आहे. या संमेलनात प्रकाशक व पुस्तक विपेत्यांसाठी ग्रंथ प्रदर्शनात गाळा/गाळे मिळण्यासाठीचे अर्ज महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात सकाळी 9 ते 12 व सायंकाळी 5 ते 7. 30 या वेळेत उपलब्ध राहणार आहेत.

गाळे आरक्षणासाठी नोंदणी शुल्क रु. 6500/- आहे. गाळय़ासाठी नोंदणी 21 नोव्हेंबर 2019 पासून ते दि. 20 डिसेंबर, 2019 पर्यंत रोख शुल्कासह किंवा डी. डी. स्वरूपात जमा करायची आहे. ग्रंथप्रदर्शनाच्या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास स्वागत मंडळाचे बालाजी तांबे (9421357072) ग्रंथप्रदर्शन समितीचे साकेत भांड (9881745605), सुनीताराजे पवार (9823068292) आणि कुंडलिक अतकरे (9325214191) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच ज्या साहित्यप्रेमींना संमेलनासाठी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहायचे आहे, त्यांच्यासाठी (रु. 3000/- 3 दिवस निवासासहित भोजन व नाष्टा) असे प्रतिनिधी शुल्क आकारण्यात येणार आहे. तरी ज्या गाळेधारकांना किंवा प्रतिनिधींना नोंदणी करायची असेल, त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेत वरील वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले आहे.

Related posts: