|Monday, February 24, 2020
You are here: Home » leadingnews » विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस 

ऑनलाईन टीम / मुंबई :

महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची भाजपने एकमताने निवड केली आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधानसभेच्या सत्रात फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली.

नाना पटोले यांनी विधानसभेच्या आजच्या सत्रात फडणवीसांची विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती झाल्याची घोषणा केल्यानंतर सभागृहातील सर्वच नेत्यांनी फडणवीसांचे अभिनंदन केले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला.

त्यानंतर केलेल्या भाषणात उद्धव म्हणतात, भाजप-शिवसेना 25 ते 30 वर्ष एकत्र होती. आज देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असले तरी ते विरोधक नाहीत. विरोधी पक्षनेता हा माझा मित्रच आहे. त्यामुळे दोघांमध्ये अंतर नसावे, कोणाचे वाभाडे काढायचे आपली परंपरा नाही, असे उद्धव यांनी म्हटले आहे.

Related posts: