|Friday, December 13, 2019
You are here: Home » मनोरंजन » विक्की वेलिंगकरमध्ये सोनाली कुलकर्णीचा आगळावेगळा लूक

विक्की वेलिंगकरमध्ये सोनाली कुलकर्णीचा आगळावेगळा लूक 

अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार निर्मित तसेच प्रणय चोकसी आणि डान्सिंग शिवा प्रस्तुत मराठी चित्रपट विक्की वेलिंगकरमध्ये सोनाली कुलकर्णीचा आगळावेगळा लूक पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे सध्या उत्सुकता वाढली आहे.

सौरभ वर्मा यांचे दिग्दर्शन असलेल्या विक्की वेलिंगकरमध्ये सोनाली कुलकर्णी, स्पफहा जोशी, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, संग्राम समेळ आणि रमा जोशी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. विक्की वेलिंगकरच्या या ट्रेलरमध्ये मास्क मॅनचा अधिक घाबरवणारा चेहरा समोर येतो. चित्रपटाची नायिका सोनाली कुलकर्णीच्या गर्भगळीत अवस्थेमुळे प्रेक्षकांमध्येही एक भीती निर्माण होते. ती काळाच्या विळख्यातून सुटू शकेल का?, हे पडद्यावर उमटणारे शब्द काहीतरी अघटित तर घडणार नाही ना, अशी धास्ती निर्माण करून जातात. लाईफ इज फुल ऑफ सरप्रायझेस असे वाक्य सोनालीच्या तोंडी आहे. तसेच या चित्रपटामध्येही अनेक सरप्रायजेस दडलेली असतील असा कयास प्रेक्षक बांधून जातो. या ट्रेलरची सध्या जोरदार चर्चा समाजमाध्यमांवर सुरू झाली आहे.

विक्की वेलिंगकर ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून, ती एक घडय़ाळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहणाऱया नायिकेची ही कथा आहे, असे उद्गार चित्रपटाचे दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनी काढले. त्यांनी यापूर्वी मिकी व्हायरस आणि 7 अवर्स टू गो आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. जीसिम्सचे अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार म्हणतात, ‘या ट्रेलरला समाजमाध्यमांवर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याने प्रेक्षकांमध्ये एक जिज्ञासा निर्माण केली आहे. मराठीतील हा एक आगळावेगळा असा अनुभव असणार आहे. त्याचीच एक झलक टीझरमध्ये पाहायला मिळाली आहे.

सौरभ वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती जीसिम्सचे अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार तसेच प्रणय चोकसी, डान्सिंग शिवा प्रॉडक्शनचे अनुया चौहान कुडेचा, रितेश कुडेचा, सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांची आहे.

Related posts: