|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » दाक्षिणात्य अभिनेत्रीचा भाजपमध्ये प्रवेश

दाक्षिणात्य अभिनेत्रीचा भाजपमध्ये प्रवेश 

नमिता तसेच राधा रवि यांना पक्षाचे सदस्यत्व

चेन्नई

 भाजप मागील काही काळापासून तामिळनाडूसह पूर्ण दक्षिण भारतात स्वतःच्या अस्तित्वात भर करू इच्छित आहे. या धोरणानुसार भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जयप्रकाश नड्डा यांनी तामिळनाडूचा दौरा करत कार्यकर्त्यांसह जिल्हा स्तरावर पक्षाचा प्रभाव वाढविण्यावर चर्चा केली आहे. यानुसार नड्डा यांच्या उपस्थितीत तमिळ अभिनेत्री नमिता तसेच राधा रवि यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे.

राधा रवि यापूर्वी द्रमुकमध्ये होते पण अभिनेत्री नयनतारा यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यावर त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले होते. जून महिन्यात त्यांनी अण्णाद्रमुकमध्ये प्रवेश केला होता.

नमिता यांनी बिल्ला, जगन मोहिनी यासारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे. दक्षिण भारतात त्यांच्या चाहत्यांची मोठी संख्या आहे. नमिता या मूळच्या तामिळनाडूच्या नव्हे तर गुजरातमधील सूरत शहराच्या रहिवासी आहेत. मिस सूरतचा मान प्राप्त केल्यावर त्यांनी 2001 मध्ये मिस इंडिया स्पर्धेत भाग घेत तिसरे स्थान पटकाविले होते.

2002 साली त्यांनी सोन्थम या तेलगू चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. पुढील काळात त्यांना अनेक ग्लॅमरस भूमिका मिळू लागल्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्या अत्यंत लोकप्रिय ठरल्या. नमिता यांच्या एका चाहत्याने कोईम्बतूर येथे त्यांचे मंदिरच उभारले आहे.

Related posts: