|Sunday, January 19, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » काश्मीर-बारामुल्लामधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त

काश्मीर-बारामुल्लामधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त 

मोठय़ा प्रमाणात दारुसाठा, एके 47 जप्त

वृत्तसंस्था/ जम्मू-काश्मीर

काश्मीरसह देशात मोठय़ा दहशतवादी हल्ल्याचा कट भारतीय जवानांनी उधळून लावला. उत्तर काश्मीरमध्ये एका दहशतवादी तळावर रविवारी कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरून मोठय़ा प्रमाणात दारुसाठा तसेच एके 47 रायफल हस्तगत केल्या. कारवाईचा संशय येताच जंगलाचा फायदा घेऊन दहशतवादी पळून गेले. त्यांचा शोध सुरू आहे. परिसरातील फोन ट्रक करण्यात आले असून सुरक्षा तसेच गस्त वाढविली आहे. विशेष मोहीम दल (एसओजी), राष्ट्रीय रायफल  (आरआर) यांच्यासह सीआरपीएफ च्या 92 बटालियनने संयुक्तपणे ही यशस्वी मोहीम राबविली.

 काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटविल्यापासून मोठय़ा प्रमाणात दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. शनिवारी बारामुल्ला जिल्हय़ातील जंगलात दहशतवादी तळ सक्रीय असल्याची माहिती जवानांना मिळाली. त्यानंतर मोहिमेस त्वरित सुरुवात करण्यात आली. जवान तळाच्या दिशेने येत असल्याचा संशय येताच 4 ते 5 दहशतवाद्यांनी जंगलात पलायन केले. यावेळी तळावर असलेला दारुसाठा, रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत. यात तब्बल 2000 गोळ्यांचा साठा, दोन एके 47 रायफल, तीन आरपीजी, तीन वायरलेस सेट तसेच हल्ला करण्यास लागणारी सामुग्रीही होती.

Related posts: