|Friday, December 13, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘व्हॅक्युम क्लिनर’ नाटक कोकणवासियांच्या भेटीला

‘व्हॅक्युम क्लिनर’ नाटक कोकणवासियांच्या भेटीला 

  6 ते 8 डिसेंबरदरम्यान रंगणार प्रयोग

पुणे / प्रतिनिधी :

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत यांच्या विनोदी अभिनयाने नटलेले अष्टविनायक निर्मित ‘व्हॅक्युम क्लिनर’ हे नाटक आता येत्या 6 ते 8 डिसेंबर कोकणवासियांच्या भेटीला येत आहे.

हे नाटक 6 डिसेंबरला मालवण, 7 डिसेंबरला सावंतवाडी, 8 डिसेंबरला कुडाळ येथे सादर होईल. या नाटकाच्या माध्यमातून अशोक सराफ आणि निर्मिती सावंत या दोघांच्या अभिनयाची धमाल कोकणातील प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने हे दोघे रंगभूमीवर प्रथमच एकत्र येत आहेत. या नाटकात अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांच्यासह तन्वी पालव, मौसमी तोंडवळकर, प्रथमेश चेऊलकर आणि सागर खेडेकर हे कलाकार पण धमाल करताना दिसणार आहेत. नाटकाचे दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर, नेपथ्य प्रदीप मुळये, संगीत राहुल रानडे, नृत्य दिग्दर्शन फुलवा खामकर यांचे आहे.

हे नाटक म्हणजे निखळ हसवणारी फॅन्टसी आहे. कौटुंबिक नात्यातील गाठी सोडविणारे हे झकास नाटक रंगमंचावर धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षकांचे दोन घटका निखळ मनोरंजन करणारे विनोदी नाटक असल्याने हे नाटक रसिकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यांच्या प्रेमामुळेच या नाटकाची 200 व्या प्रयोगाकडे वाटचाल सुरू आहे.

नाटकाने जपले सामाजिक भान

या नाटकाच्या बुकिंगमधून आलेल्या उत्पन्नातून शहिदांना मदत केली आहे. तसेच कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्तांना मदत करून आपले सामाजिक भानही दाखवून दिले आहे.

Related posts: