डीईएस प्रायमरीला सर्वसाधारण विजेतेपद

पुणे / प्रतिनिधी :
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संस्थातर्गत आंतरशालेय सांघिक क्रीडा स्पर्धेत डीईएस प्रायमरी सकाळ विभागामने सर्वसाधारण विजेतेपद आणि नवीन मराठी शाळेला उपविजेतेपद मिळविले. लंगडी, टेन पासेस, रीलेज आदी खेळांच्या स्पर्धा झाल्या. सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे आणि संचालक मिलिंद कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
शिक्षण अधिकारी समग‘ शिक्षा अधियान प्रकल्प अधिकारी शिक्षण मंडळ पुणे मनपा शिल्पकला रंंधवे आणि सोसायटीचे संचालक खेमराज रणपिसे यांच्या हस्ते बक्षिस वितरण केले जाते. डीईएस प्रायमरी स्कूलच्या मु‘याध्यापिका स्मिता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाली योगिनी कानडे, श्रीकांत जोशी, हर्षदा कारेकर यांनी संयोजन केले.