|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » गोळवलकर गुरूजी, सयाजीनाथ महाराज विद्यालयाला विजेतेपद

गोळवलकर गुरूजी, सयाजीनाथ महाराज विद्यालयाला विजेतेपद 

पुणे / प्रतिनिधी :

मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी भाषेचा न्यूनगंड दूर करण्यासाठी श्रीकांत भावे स्मृती करंडक इंग्रजी संवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत टिळक रस्त्यावरील छोट्या गटात आळंदी येथील श्री सयाजीनाथ महाराज विद्यालय वडमुखवाडी तर मोठ्या गटात माधव सदाशिव गोळवलकर गुरूजी विद्यालय यांनी विजेतेपद पटकाविले.

नातूबाग परिसरातील सौ. सुशिलाबाई वीरकर मुलांचे हायस्कूल व आदर्श विद्यालय मुलींचे हायस्कूल या शाळेतील माजी विद्यार्थी संघटनेतर्फे मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांकरीता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे मानद कार्यवाह प्रकाश जोशीराव यांच्या हस्ते झाले. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचे दिग्दर्शक कार्तिक केंढे, वंदना भावे, आदर्श शिक्षण मंडळीचे कार्याध्यक्ष सुनिल घुले, सहसचिव राधिका मंडलिक, खजिनदार रेखा मोरे, स्पर्धा प्रमुख प्रशांत मते, डी.पी.जोशी, शिरीष मोहिते, आनंद आंबेकर, गिरीष भोईटे, किरण रासकर, नितीन होले, सारिका सणस, नयना नाईक, अंजली धुमाळ आदी उपस्थित होते. संदीप सोनिस, मंजुषा पुराणिक यांनी स्पर्धेचे परिक्षण केले. स्पर्धेचे यंदा १० वे वर्ष होते. स्मृतीचिन्ह आणि  प्रमाणपत्र देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले.
 
कार्तिक केंढे म्हणाले, आपल्या मातृभाषेवर आपले प्रेम व अभिमान असला पाहिजेच, परंतु आपल्याला आपल्या इतर भाषा देखील आली पाहिजेत. ही छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना दिलेली शिकवण त्यांनी लक्षात ठेवली. जेव्हा संभाजी महाराज छत्रपती झाले तेव्हा त्यांना देशातील १६ भाषा येत होत्या. आपण शैक्षणिक जीवनातून व्यावसायिक जीवनात जेव्हा प्रवेश करतो तेव्हा त्या प्रांतातील भाषा आपल्याला आल्या पाहिजेत. जागतिक स्पर्धेत पुढे जाण्यासाठी इंग्रजी भाषा तुम्ही अवगत केली पाहिजे, असे ही त्यांनी सांगितले. प्रदीप अष्टपुत्रे, संदीप गायकवाड, संजय शहा यांनी सूत्रसंचालन केले. 

Related posts: