सोनई तिहेरी हत्याकांड : पाच दोषी आरोपींची फाशी कायम

ऑनलाइन टीम / मुंबई :
संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱया 2013 मधील सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी सहा पैकी पाच दोषी आरोपींची फाशी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. तर अशोक नवगिरे या आरोपीला न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केलं आहे. नवगिरे यांच्यावतीने ऍड. नितीन सातपुते यांनी युक्तीवाद केला होता.
या खटल्यात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने 7 पैकी 6 आरोपींना दोषी ठरवलं होतं, तर अशोक फलके या आरोपीची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर पोपट दरंदले, प्रकाश दरंदले, रमेश दरंदले, गणेश दरंदले, अशोक नवगिरे आणि संदीप कुऱहे या दोषींनी या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिलं होतं. तर राज्य सरकारच्यावतीने फाशीची शिक्षा कायम ठेवण्यासाठी हायकोर्टात याचिका केली होती. 1 जानेवारी 2013 रोजी सोनाईतील नेवासा फाटा इथे 3 तरुणांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती.
आंतरजातीय प्रेमप्रकरणातून धुळे जिह्यातील तीन दलित मजूर युवकांची हत्या करून त्यांचे मृतदेहांचे तुकडे करून सेफ्टकि टँकमध्ये टाकण्यात आले होते. खर्डा आणि जवखेड प्रकरणाच्या आधीची ही घटना आहे.