|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » साहित्यिक कलावंत संमेलनाध्यक्षपदी डॉ.रामचंद्र देखणे

साहित्यिक कलावंत संमेलनाध्यक्षपदी डॉ.रामचंद्र देखणे 

पुणे / प्रतिनिधी : 

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित 19 वे साहित्यिक कलावंत संमेलन येत्या 28 आणि 29 डिसेंबर 2019 रोजी यशवंतराव चव्हाण नाटय़गृह कोथरूड, पुणे येथे होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकवाङ्मय आणि संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, लेखक, प्रवचनकार डॉ. रामचंद्र देखणे यांची निवड करण्यात आली आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

डॉ. रामचंद्र देखणे यांनी संशोधनात्मक आणि चिंतनात्मक अशा 47 पुस्तकांचे लेखन केले असून बहुरुपी भारूड या संत एकनाथांच्या भारुडाचे एकवीसशेहून अधिक प्रयोग केले आहेत. यापूर्वी डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. आनंद यादव, प्रा. रा. ग. जाधव, उत्तम कांबळे, नारायण सुर्वे, डॉ.यशवंत मनोहर, फ. मु. शिंदे, रामदास फुटाणे आणि फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी या संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविले आहे.

Related posts: