|Friday, December 13, 2019
You are here: Home » संवाद » मैद्यापासून सावधान

मैद्यापासून सावधान 

मैद्याचे जास्त आणि वारंवार पदार्थ खाल्ल्यानं वजन वाढणं सुरु होतं. अंगी लठ्ठपणा येतो. इतकंच नाही तर यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही वाढतं. रक्तातील ट्रायग्ल‌सिराइडलाही यामुळे चालना मिळते. तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर मैदा खाणं कायमच बंद करावं.

मैदा हा अतिशय चिवट पदार्थ असतो. त्यामुळे पचनासदेखील जड असतो. आतडय़ामधून तो लवकर पुढे सरकत नाही. त्यामुळे आम्लपित्त, अपचन, मळमळ, मलावष्टभ, वायू असे पोटाचे विकार सुरू होतात. त्याचबरोबर शरीराला फक्त उष्मांक मिळाल्यामुळे लठ्ठपणा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह हेही आजार वाढीस लागतात.

  मैद्यामध्ये शरीराला पोषक अशी मूलद्रव्ये, जीवनसत्त्वे, प्रथिने, चोथा नसल्याने त्याच्या अतिसेवनाने आरोग्य धोक्मयात येते. उदा- त्वचाविकार (तोंडावर पांढरट चट्टे येणे), डोळय़ाचे विकार (रातांधळेपणा), मुखपाक (तोंड येणे) असे विकार निर्माण होतात.

आधुनिक काळातदेखील मैदा हा आरोग्यास घातक आहे हे सिद्ध झाले आहे. मैदा करण्याच्या क्रियेत क्रोमियम, झिक, तांबे व मॉलीबिडीनम यासारखी शरीरवाढीस उपयोगी मूलद्रव्ये नष्ट होतात म्हणून तो कमी प्रमाणात खावा. कारण आरोग्य चांगले राहण्यासाठी ही सर्व मूलद्रव्ये आवश्यक आहेत. परंतु समाजातील उच्चभ्रू सुशिक्षित वर्गापासून ते औद्योगिक क्षेत्रात काम करणारे शहरातील कामगारवर्ग, शाळकरी मुले मैद्याच्या पदार्थांना गैरसमजुतीने प्रति÷ा मिळाल्याने चविष्ट असल्याने अति प्रमाणात खातात ही अत्यंत खेदाची बाब आहे.

पर्यायी पदार्थ

 सर्व पदार्थ बनविण्यासाठी मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करावा. पाश्चात्य देशांमध्येसुद्धा मैद्याचे दुष्परिणाम लक्षात आल्यामुळे व्हाइट ब्रेडऐवजी गव्हाच्या कोंडय़ासह तयार केलेला ब्राऊन ब्रेड वापरतात. या ब्रेडमध्ये सर्व जीवनसत्त्वे असतात.

पोटासाठी वाईट

मैदा पोटासाठी वाईट असतो. मैद्यात फायबर नसल्यानं पोट नीट साफ होत नाही.

प्रोटिनची कमतरता

मैद्यात ग्लूटन असतं. ते फूड ऍलर्जी तयार करतं. ग्लूटन जेवणाला लवचिक करून त्याला मऊ टेक्स्चर देतो. त्याचे दुष्परिणाम होतात. तेच गव्हाच्या पिठात मोठय़ा        प्रमाणात फायबर आणि प्रोटिन असतं. मैद्यात या दोन्ही बाबी नसतात.

हाडं होतात कमकुवत

मैदा तयार करताना यातील प्रोटिन काढलं जातं. परिणामी मैदा ऍसिडिक होतो. त्याचा परिणाम हाडांवर होतो. हाडांतील कॅल्शियम मैदा शोषून घेतो. त्यामुळे हाडं कमकुवत होतात.

हृदयाचा त्रास

रक्तातील साखर वाढते तेव्हा रक्तात ग्लुकोज गोळा होऊ लागतं. यामुळे शरीरात केमिकल रिऍक्शन होते आणि कॅटरॅक्टपासून हृदयाचा त्रास ओढावू शकतो.

अन्य आजारांचा धोका

मैदा नियमित खाल्ल्यानं शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमजोर होते. वारंवार आजारी पडण्याची शक्मयता बळावते. यापासून बचाव करण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी मैदा टाळलेलाच बरा. तसेच मैद्याचे पदार्थ पचायला जड असल्यानं बद्धकोष्टतेचा त्रास होतो.

Related posts: