|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वाचन संस्कृतीच्या प्रकाशवाटा प्रेरणादायी

वाचन संस्कृतीच्या प्रकाशवाटा प्रेरणादायी 

वाचन संस्कृती कार्यक्रमात युवाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

प्रतिनिधी / कणकवली:

सध्याच्या काळात सक्षम आयुष्य जगायचे असेल, तर वाचनाची कास धरण्याचा प्रयत्न करायला हवा. मनाची शांती, एकाग्रता आणि बौद्धिक सक्षमता यासाठी वाचन हा महत्वाचा पर्याय आहे. यासाठी युवकांनी वाचनालयाची वाट धरायला हवी. ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांच्या ‘प्रकाशवाटा’ हे आत्मचरित्र वाचल्यामुळे वाचन संस्कृती उपक्रमाचे महत्व लक्षात आले. हा उपक्रम आयुष्याच्या ध्येयाकडे जाण्यासाठी प्रेरणादायी असल्याची जाणीव होत गेली, अशा शब्दांत तरुणाईने आपल्या भावना व्यक्त केल्या. निमित्त होते, ते गोपुरी आश्रमात आयोजित वाचन संस्कृती उपक्रमाचे.

गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर आणि संचालक अर्पिता मुंबरकर यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमाला युवाईने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रसाद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला डॉ. मुंबरकर, सौ. मुंबरकर यांच्यासह वाचन संस्कृती उपक्रमाचे सचिव पल्लवी कोकणी, संघटक अंकिता सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात युवकांपैकी सीमरन हरमलकर हिने आमटे यांच्या ‘प्रकाशवाटा’  आत्मचरित्राचे विवेचन करताना, बाबा आमटे यांनी कु÷रोगी नागरिकांसाठी आपल्या ऐश्वर्याच्या जीवनाचा कसा त्याग केला आणि हा आदर्श प्रकाश आमटे यांनी स्वत:च्या जीवनाचे मिशन कसे मानले? कु÷रोग्यांची सेवा करता-करता वन्य    प्राण्यांना कसा जिव्हाळा लावला, याचे अभ्यासपूर्ण विवेचन उपस्थितांसमोर केले.  अमेय हिर्लेकर याने नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या ‘हवे पंख नवे’ या नाटकाचे विवेचन केले. पल्लवी कोकणी हिने सप्टेंबर 2019 च्या ‘माहेर’ मासिकातील ‘सरकारी खाक्मया’ या लेखावर विवेचन करताना सरकारी कामाच्या व्यवस्थेवर     प्र्रकाश टाकला. बंदिनी परबने मिळून साऱयाजणीच्या दिवाळी मासिकातील        श्रीरंजन आवटे यांच्या ‘चक्रव्युहात अडकलेला अभिमन्यू’ या लेखाचे विवेचन करताना विशिष्ट वयात आजची तरुण पिढी करिअरच्या शोधात आपली ओळख कशी विसरून जाते, याविषयी आवटे यांनी तरुणांच्या जगण्यासाठी धडपडणाऱया अस्तित्वावर टाकलेला प्रकाश सर्वांसमोर मांडण्याचा प्र्रयत्न केला. अंकिता सामंत हिने याच अंकातील ‘शोघ माझा मला’ या सोनाली दळवी यांच्या ट्रान्सजेंडरच्या प्रवासाबद्दल त्यांच्या पालकांच्या त्यांच्याविषयीच्या असलेल्या गैरसमजाबाबतचे विचार  कथन केले. सोनल भिसे हिने बालकुमार साधना दिवाळी अंकातील गर्विता गुल्हाटी या 12 वर्षांच्या मुलीने राबविलेली हॉटेलमधील पाणी वाचविण्याच्या ‘अर्धा ग्लास प्लीज’ या चळवळीविषयी माहिती सांगितली. तेजश्री आचरेकर हिने कुसुमाग्रजांची ‘कणा’ ही कविता, तर अमित राऊळने स्वरचित होसला (हिंदी), ‘माणूस’ ही कविता सादर केली. अध्यक्ष प्रसाद सावंत यांनी कार्यक्रमाचा आढावा घेतला. प्र्रास्ताविक अमित राऊळ याने, सूत्रसंचालन चिंतामणी सामंत याने, तर आभार तेजश्री आचरेकर हिने मानले.

महिला डॉक्टरच्या हत्येबाबत चर्चा

 दोन दिवसांपूर्वी महिला डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि तिची हत्या या विषयावरही यावेळी चर्चा करण्यात आली. अशा स्वरुपाच्या गुन्हय़ांना मुली-महिलांनी कसा प्रतिकार करावा, कुटुंब, नातेवाईक व समाजाची भूमिका काय असावी, याबाबत चर्चा करण्यात आली.

Related posts: