|Friday, December 13, 2019
You are here: Home » उद्योग » देशभरातील उत्पादन क्षेत्रात किरकोळ वृद्धी

देशभरातील उत्पादन क्षेत्रात किरकोळ वृद्धी 

मंदीचे सावट मात्र कायम : नोव्हेंबरमधील मासिक सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून स्पष्ट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील उत्पादन क्षेत्राच्या कामकाजांमध्ये नोव्हेंबर महिन्यात किरकोळ वृद्धी झाली आहे. मात्र, नवीन ऑर्डर आणि उत्पादनातील कमतरतेमुळे एकूणच या क्षेत्राचा वृद्धी दर मंदावला असल्याचे औद्योगिक क्षेत्रातील एका मासिक सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.  

आयएचएस मार्केट इंडिया मॅन्यूपॅक्चरिंगचा खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (पीएमआय) नोव्हेंबरमध्ये वधारत 51.2 इतका झाला आहे. हाच निर्देशांक ऑक्टोबरमध्ये 50.6 अंकांनी दोन वर्षाच्या नीच्चांकी स्तरावर होता. उत्पादन क्षेत्राचा पीएमआय सलग 28 व्या महिन्यात 50 अंकांपेक्षा वधाराच्या स्तरावर होता. नोव्हेंबरच्या निर्देशांकावरून उत्पादन क्षेत्राच्या स्थितीत सुधारणा होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

पीएमआय सर्व्हेतील सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार उत्पादन क्षेत्रातील उपक्रमांची स्थिती या वर्षाच्या सुरुवाती महिन्यांच्या तुलनेत अजूनही मंदावली आहे. परंतु, अजूनही कारखान्यांची ऑर्डर, उत्पादन आणि निर्यातीमधील वाढ आर्थिक वर्षाच्या तुलनेत खुपच मागे आहे. ही परिस्थिती ओढवण्यामागे एकूणच मागणीत घट झाल्याचे, आयएचएस मार्केटचे प्रमुख अर्थ सल्लागार पोलियाना डी लीमा यांनी सांगितले.

आरबीआयच्या निर्णयाकडे लक्ष…

आर्थिक वृद्धी दरातील मंदावलेला वेग पाहता भारतीय रिझर्व्ह बँक आता व्याज दर कमी करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीचा द्विमासिक आढावा 5 डिसेंबरमध्ये सादर होणार आहे. व्याज दरात कपात झाल्यास ही सहाव्यांदा कपात ठरणार आहे. याचा परिणाम उत्पादन क्षेत्रावर होण्याचे संकेत आहे. 

Related posts: