|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » महिला भजन स्पर्धेत कणकवली प्रथम

महिला भजन स्पर्धेत कणकवली प्रथम 

राज्यस्तरीय महिला भजन स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी / कणकवली:

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय, चिपळूणतर्फे येथील  महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित गटस्तरीय महिला भजन स्पर्धेत कणकवली कामगार कल्याण केंद्राच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. त्यामुळे राज्यस्तरीय महिला भजन स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आहे.

या भजन स्पर्धेत महाड, पोफळी, चिपळूण, खेर्डी वसाहत, रत्नागिरी, कर्ला वसाहत, कणकवली, कुडाळ, पिंगुळी वसाहत, आडवली, सावंतवाडी येथील 11 संघांनी सहभाग घेतला होता.

स्पर्धेत द्वितीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र, सावंतवाडी, तृतीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र चिपळूण-खेर्डी वसाहत यांनी मिळविला. उत्तेजनार्थ कामगार कल्याण केंद्र, महाड व कामगार कल्याण केंद्र, चिपळूणची निवड करण्यात आली.

वैयक्तिक पारितोषिकांमध्ये सर्वोत्कृष्ट पखवाज-तबला वादक 1. प्राजक्ता संतोष परब (सावंतवाडी), 2. वृषिका गोपाळ वर्दम (कणकवली ). सर्वोत्कृष्ट गायिका-1. संजीवनी बाळकृष्ण वर्दम (कणकवली), 2. वरदा विरेंद्र जोशी (सावंतवाडी), 3. मेघना आनंद शेंबेकर (चिपळूण, खेर्डी वसाहत). सर्वोत्कृष्ट हार्मोनियमवादक- 1. लीना अरुण चितळे (चिपळूण, खेर्डी वसाहत), 2. वैष्णवी तळवडेकर (आडवली), 3. वैशाली विठ्ठल कोंडसकर (कुडाळ). तसेच सर्वोत्कृष्ट तालसंचालन-1. चिपळूण, खेर्डी वसाहत, 2. सावंतवाडी, तृतीय क्रमांक आडवली.

सर्व विजेत्यांना विश्वनाथ गवंडळकर महाराज, वीणा रावराणे, नगरसेविका कविता राणे, पी. जे. कांबळे, विजय पारकर, कामगार कल्याण अधिकारी गट कार्यालय चिपळूणचे संभाजी पवार यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. हरिभाऊ भिसे, मोहन मेस्त्राr, वैदेही करंबेळकर यांनी केले.

सूत्रसंचालन केंद्र संचालक संतोष नेवरेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रभाकर जाधव, श्रीधर भरडे, सुप्रिया मोरये, श्वेता नाईक, नंदिनी मांजरेकर, दत्ताराम तळवडेकर, नवनीत राजूरकर यांनी सहकार्य केले.

Related posts: