|Friday, December 13, 2019
You are here: Home » उद्योग » शेअर बाजारात दबावाचे सत्र कायम

शेअर बाजारात दबावाचे सत्र कायम 

सेन्सेक्स 8.36 अंकांनी वधारला तर निफ्टीत 7.85 अंकांची घसरण

वृत्तसंस्था/ मुंबई

युरोपीय आणि आशियाई बाजारातून मिळालेले सकारात्मक संकेत आणि स्थानिक दूरसंचार कंपन्यांकडून शुल्कातील वाढीच्या समर्थनामुळे सोमवारी शेअर बाजारात दबाव पाहायला मिळाला.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 8.36 अंकांनी वधारत 40802.17 अंकांवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 7.85 अंकांनी घसरत 12048.20 अंकांवर बंद झाला. मध्यम आणि किरकोळ कंपन्यांमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा मिडपॅप 0.77 टक्के घसरत 1496.21 अंकांवर आणि स्मॉल पॅप 0.39 टक्क्यांनी घसरून 13508.55 अंकांवर स्थिरावला.

दूरसंचार कंपन्यापैकी भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियासह रिलायन्स जिओकडून शुल्कामध्ये सुमारे 42 टक्क्यांपर्यंत वाढ केल्याने खरेदीच्या जोरावर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 279 अंकांची तेजी घेत 41072.94 अंकांवर सुरू झाला. सुरुवातीच्या सत्रातही खरेदीच्या जोरावर 41093.99 अंकांवर उचांकी स्तर गाठला. परंतु, विक्रीची सुरुवात झाल्यानंतर ही तेजी 40707.63 अंकांच्या नीच्चांकी स्तरावर पोहोचली.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 91 अंकांच्या वाढीसह 12137.05 अंकांवर सुरू झाला आणि खरेदीमुळे हा 12137.15 अंकांच्या उचांकी स्तरापर्यंत पोहोचला. त्यानंतर सुरू झालेल्या विक्रीच्या दबावामध्ये निफ्टी 12023.70 अंकांच्या नीच्चांकी स्तरापर्यंत घसरला. मुंबई शेअर बाजारातील बहुतांश समुहांमध्ये घसरण होती. वाहन समुहात सर्वाधिक 0.94 टक्के घसरण नोंदविण्यात आली. वधारात असलेल्यामध्ये दूरसंचार 2.64 टक्के, ऊर्जा 1.28 टक्के, धातू 0.31 टक्के आणि सामान्य सामग्री 0.27 टक्के आदींचा समावेस आहे. मुंबई शेअर बाजारामध्ये सुमारे 2742 कंपन्यांमध्ये व्यापार झाला, ज्यात 1501 कंपन्यांमध्ये घसरण तर 1051 कंपन्यांत तेजी होती. त्याचबरोबर 190 कंपन्यांच्या समभागात कोणताही बदल नोंदवण्यात आला नाही.

Related posts: